वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान विराट कोहली याच्याविषयी पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. सोशल मीडियावर या दोन्ही माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद झाला होता. मात्र, आता हेच दोघे खेळाडू एकसोबत दिसले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी या दोघांचा एकसोबतचा एक फोटो समोर आला, ज्यात दोघेही हसताना दिसत आहेत.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे कारकीर्दीतील 49वे शतक ठोकले होते. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाचीही बरोबरी केली होती. यानंतर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) याने विराटविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले होते की, विराट त्याच्या शतकासाठी खेळत होता. तो म्हणालेला की, विराटने संघाविषयी विचार न करता शतक करण्याचा विचार केला.
यावर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी हाफीजला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, विराट संथ खेळपट्टीवर अँकरची भूमिका निभावत होता. त्याच्या संघाने 200 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला. ही खूपच बकवास गोष्ट आहे. यानंतर मोहम्मद हाफीज आणि मायकल वॉन (Mohammad Hafeez and Michael Vaughan) यांच्यात काही दिवस सोशल मीडियावर टक्कर पाहायला मिळाली होती.
Great to catch up with @MHafeez22 in #Perth .. pic.twitter.com/61TEyfX3I1
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 14, 2023
मायकल वॉनचे ट्वीट
मात्र, आता दोन्ही खेळाडूंचा एक फोटो समोर आला आहे, जो मायकल वॉन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटरून शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, “पर्थमध्ये मोहम्मद हाफीजला भेटून चांगले वाटले.”
खरं तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात पर्थ येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. यात हाफीज पाकिस्तानच्या प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे, तर मायकल वॉन ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग आहेत. (former cricketer michael vaughan mohammad hafeez click friendly selfie after social media banter)
हेही वाचा-
दुसऱ्या टी20तून बाहेर असलेल्या बिश्नोईविषयी गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले, ‘तो अजूनही…’
जिद्दीला सलाम! भारतीय खेळाडूला गंभीर दुखापत, तरीही पट्टी बांधून आला फलंदाजीला