इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगाम दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खास ठरला नव्हता. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्या खांद्यावर होती. दिल्ली गुणतालिकेत नवव्या स्थानी राहूनही आता पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पाँटिंगलाच मिळणे जवळपास पक्के आहे. संघमालक पार्थ जिंदल यांनीच असे संकेत दिले आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊयात…
खरं तर, असे म्हटले जात होते की, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या खराब प्रदर्शनानंतर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला प्रशिक्षकपदावरून हटवले जाऊ शकते. पार्थ जिंदल (Parth Jindal) यांनी सर्व शंका कुशंका दूर करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. त्यांनी यावेळी थेट घोषणा केली की, क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि रिकी पाँटिंग थिंक टँकचा भाग राहतील.
जिंदल म्हणाले की, “दिल्ली कॅपिटल्समध्ये पुढील वर्षीसाठी आयपीएल तयारी सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांच्यासोबत सुरू आहे. आम्ही चाहत्यांना खात्री देतो की, किरण आणि मी संघाला त्या ठिकाणी पुन्हा आणण्यासाठी कठोर मेहनत करू, ज्या ठिकाणी आपण या फ्रँचायझीला आणू इच्छितो आणि हे वरच्या स्थानी आहे.”
Preparations for next years @IPL are underway here @DelhiCapitals , along side @SGanguly99 and @RickyPonting we assure the fans that Kiran and I are working hard to get back to where we want this franchise to be and that is right at the very top.
— Parth Jindal (@ParthJindal11) June 14, 2023
मात्र, यावेळी स्पष्ट झाले नाही की, पाँटिंगला त्याच्या आवडीचा सहाय्यक स्टाफ मिळेल की नाही. कारण, पुढील हंगामात शेन वॉटसन आणि जेम्स होप्स डगआऊटमध्ये नसतील. तसेच, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून बीजू जॉर्ज यांच्याबाबतही कोणतीच स्पष्टता नाहीये. याव्यतिरिक्त प्रवीण आमरे आणि अजित आगरकर हे कायण राहण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, आयपीएल 2023 हंगामात दिल्ली संघाने खूपच खराब कामगिरी केली होती. संघाने 14 पैकी फक्त 5 सामने जिंकले होते, तर 9 सामन्यात त्यांंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. दुखापतग्रस्त रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर (David Warner) याला कर्णधार बनवले गेले होते. मात्र, संघाने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले होते. आता आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात दिल्ली संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष राहील. (former cricketer ricky ponting to remain delhi capitals head coach hints co owner parth jindal)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी किशनचा मोठा निर्णय, ‘या’ स्पर्धेतून घेतली माघार; युवा खेळाडूची वर्णी
प्रवीण आमरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! थेट अमेरिकेतून आलं बोलावणं, लगेच वाचा