माजी भारतीय क्रिकेटपटू सलील अंकोला आज (०१ मार्च) आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दुर्देवाने वाढदिवसाच्या एक दिवसआधी ते जागतिक महामारी कोविड-१९ च्या विळख्यात सापडले आहे. यामुळे त्यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
रुग्णालयातील आपला फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, ‘उद्या माझा वाढदिवस आहे आणि आज कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडलो आहे. अविस्मरणीय वाढदिवस. या महामारीचा सामना करणे कठीण आहे. परंतु मला तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे. मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन परत येईल.’
सलील अंकोला यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटी पदार्पणावेळी आपल्याही कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तानविरुद्ध त्यांनी पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात त्यांनी ६ धावा केल्या होत्या आणि २ विकेट्स घेतल्या होत्या.
याबरोबरत सलील यांनी भारताकडून २० वनडे सामने खेळले आहेत. यात त्यांनी ४७.३० च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकातही समावेश होता. त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये २८ वर्षांचे असतानाच अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
https://www.instagram.com/p/CL1tshMpgtw/?utm_source=ig_web_button_share_sheet
यानंतर सलीलनी टीव्ही मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांची ‘शss कोई हैं’ तसेच ‘विक्राल और गब्राल’ मधील विक्रालची भूमीका चांगली गाजली होती. तसेच त्यांनी काही चित्रपटातही काम केले आहे. यात कुरुक्षेत्र, पिताह, चुरा लिया हैं तुमने, अशा काही चित्रपटांचा समावेश होतो. सलिलनी जरी क्रिकेट सोडले असले तरी क्रिकेटशी असलेली नाळ त्यांना सोडता आली नाही. ते सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनसोबत कसोटी व वनडे पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर
त्याचं नशीबचं इतकं खराब होतं की सचिनबरोबर पदार्पण केलं, पण खेळला एकच कसोटी सामना
मराठीत माहिती- क्रिकेटर सलील अंकोला