आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ 12 वर्षांनंतर किताब जिंकण्याचे स्वप्न घेऊन उतरला होता. भारताने साखळी फेरीत जागतिक दर्जाचे प्रदर्शन करत सर्वच्या सर्व 9 सामने जिंकले होते. एवढंच काय, तर उपांत्य सामन्यातही न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देत अंतिम सामना गाठला होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघापुढे भारताचा निभाव लागला नाही. भारताला हा सामना 6 विकेट्सने गमवावा लागला.
भारताने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेदरम्यान चांगले प्रदर्शन केले असले, तरीही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा विश्वास आहे की, भारताला त्या चुकांमधून शिकावे लागेल, ज्या 19 नोव्हेंबरला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात (World Cup 2023 Final) केल्या होत्या. त्यांनी असेही म्हटले की, ट्रॉफी न जिंकणे निराशाजनक आहे.
गावसकरांचे विधान
गावसकरांनी मिड-डेमधील आपल्या स्तंभात लिहिले की, “जर भारताला पुढे जायचे असेल आणि ट्रॉफी जिंकायची असेल, तर त्यांना अंतिम सामन्यात केलेल्या चुका स्वीकाराव्या लागतील. एकजुटता दाखवण्याचा प्रयत्न करणे एक गोष्ट आहे, पण जर चुका स्वीकारल्या नाहीत, तर प्रगती संथ होईल. पुढील काही आठवड्यांमध्ये अधिकारी आणि निवड समितीला मोठे निर्णय घ्यावे लागतील. 2007 नंतर भारताचे टी20 विश्वचषक न जिंकू शकणे एक मोठी निराशा आहे. कारण, खेळाडू आणि युवांना आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा मिळत आहे.”
भारतीय संघाने 2011मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तसेच, टी20 विश्वचषक 2007मध्ये जिंकला होता. त्यानंतर भारताच्या पारड्यात एकही आयसीसी ट्रॉफी आली नाहीये. अशात संघ व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांना हा विचार करावा लागेल की, अखेर आपण कुठे कमी पडत आहोत. गावसकरांनी याविषयी लिहिले की, “यामध्ये कोणतीही शंका नाहीये की, भारताचे विश्वचषक न जिंकणे निराशाजनक होते. मात्र, आता हे संपले आहे आणि खेळ पुढे जाईल. मागील चार विश्वचषकात भारतीय संघाने एका विजयासह दोन वेळा अंतिम सामन्यात पोहोचला आणि इतर दोन वेळा उपांत्य सामन्यात पोहोचला. जेव्हा तुम्ही याची तुलना इतर संघांशी करता, तेव्हा हे एक शानदार प्रदर्शन आहे आणि फक्त ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन 2 ट्रॉफी जिंकून शानदार राहिले आहे.”
खरं तर, पुढील वर्षी जून महिन्यात टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका मिळून करणार आहे. अशात या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ काय मोठे निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer sunil gavaskar expects big decisions to be taken in awake of world cup 2023 defeat)
हेही वाचा-
बुमराह आयपीएलमध्ये गुजरात संघाचा कर्णधार होण्याचा विचार करतोय! दिग्गज क्रिकेटरचे भाष्य
T20 World Cup 2024 स्पर्धेत खेळणार रोहित आणि विराट? दिग्गज म्हणाला, ‘IPLमधून…’