भारताचा मर्यादित षटकांच्या संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेला आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने याअगोदर एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिला टी२० सामना देखील खेळला आहे. यामध्ये श्रीलंका संघाला ३८ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
परंतु या दौऱ्यावर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे प्रदर्शन खराब झाले आहे. त्याने एकदिवसीय मालिकेत १९ धावा आणि ० धावा केल्या आहेत. तर पहिल्या टी२० सामन्यात त्याने फक्त १० धावा केल्या आहे. या सर्व सामन्यात त्याची खेळी पाहून असे वाटत होते की तो त्याच्या लयीपासून भटकला आहे. कारण त्याच्या खेळीमध्ये पूर्वीसारखी चमक दिसली नाही. अशा परिस्थितीत तो संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, माजी भारतीय दिग्गज दिग्गज सुनील गावस्कर यांनी हार्दिक पांड्याची जागा घेणार्या दोन खेळाडूंची नावे सांगितली आहेत.
यावर्षी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी हार्दिक पुन्हा फॉर्मात येण्याची खूप गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर तशी भारतीय संघ व्यवस्थापनाची देखील अपेक्षा आहे. कारण फिनिशर म्हणून तो विरोधी संघांसाठी धोकादायक ठरू शकतो. हार्दिकच्या लयीबद्दल बोलताना माजी भारतीय सलामीवीर सुनील गावस्कर म्हणाले की, भारतीय संघाने दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार या २ खेळाडूंची चांगली तयारी करून घेतली, तर ते हार्दिकची कमतरता भरून काढू शकतात.
गावस्कर स्पोर्ट्स तकवर म्हणाले की, “अर्थातच एक बॅकअप आहे. तुम्ही नुकतीच दीपक चाहरची फलंदाजी पाहिली असे. त्याने सिद्ध केले की तो अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. दोन-तीन वर्षांपूर्वी जेव्हा भारत श्रीलंकेत खेळला होता. भुवनेश्वर सोबत धोनीने एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्या सामन्याचे दृश्य दुसर्या वनडे सामन्यासारखेच होते. त्यांनी देखील ७-८ गडी गमावले होते. भुवनेश्वर आणि धोनीने या सामन्यासाठी विजयी खेळी केली होती.”
त्याचबरोबर गावस्कर पुढे म्हणाले की, “दुसर्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरने नाबाद ६९ धावा केल्या. यावरुन तो फलंदाजीमध्ये अधिक उपयुक्त ठरू शकतो हे दीपक चाहरने सिद्ध केले. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात नाबाद १९ धावा केल्या होत्या. याच दरम्यान तो खूप शांत आणि संयमी दिसत होता. म्हणूनच या दोन्ही खेळाडूंवर लक्ष दिले तर ते चांगले अष्टपैलू बनू शकतात. या दोन्ही खेळाडूंना अष्टपैलू म्हणून अधिक संधी मिळाल्या पाहिजेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत फ्लॉप ठरलेला संजू यष्टीमागेही फेल, कर्णधार धवनला करायला लावली ‘मोठी चूक’!
श्रीलंंकेच्या सलामीवीराची विकेट भुवीसाठी ठरली विक्रमी, पूर्ण केले टी२० विकेट्सचे ‘अर्धशतक’
तुझी माझी जोडी जमली गं! अथियाच्या सेल्फीमध्ये राहुलची खास पोज, इंग्लंडमध्ये दिसले एकत्र