रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने त्याचा 36वा वाढदिवस साजरा केला. रैनाचा जन्म 27 नोव्हेंबर, 1986 रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. रैनाला त्याच्या आयपीएलमधील योगदानामुळे त्याला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, रैना हा एमएस धोनी याचा खूप जवळचा मित्र मानले जाते. दोघांनीही एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. अशात रैनाच्या वाढदिवशी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याचाही समावेश आहे.
इरफान पठाणने दिल्या रैनाला शुभेच्छा
सुरेश रैना (Suresh Raina) याच्या वाढदिवशी इरफान पठाण (Irfan Pathan) याने खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इरफानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये रैना आणि इरफान दोघेही डोसा बनवताना दिसत आहेत.
चाहता म्हणाला, ‘फक्त बनवले असेल, खाल्ले नसेल’
इरफान पठाण याने पोस्ट शेअर करत लिहिले की, “माझा प्रिय मित्र आणि मस्ती करणारा मुलगा रैनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चल भावा तुला डोसा चारतो.” व्हिडिओ पोस्ट करताच तो भलताच व्हायरल झाला. चाहत्यांनी यावर कमेंट्स करत रैनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “एक डोसा इकडेही द्या सरजी.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “फक्त बनवले असेल, खाल्ले नसेल.”
Wishing my dear friend and fun loving guy @ImRaina a very happy birthday. Chal bhai dosa khilaoo tujhe 🤗#Birthday pic.twitter.com/CYjkAB1xmK
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 27, 2022
सुरेश रैनाला म्हटले जाते ‘मिस्टर आयपीएल’
सुरेश रैना याने भारतासाठी 226 वनडे सामन्यात फलंदाजी करताना 35.31च्या सरासरीने 5615 धावा केल्या होत्या. तसेच, त्याने 78 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 29.18च्या सरासरीने 1605 धावा केल्या होत्या. कसोटी सामन्यात त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्याने 18 कसोटी सामन्यात फलंदाजीत त्याने 26.48च्या सरासरीने 768 धावा केल्या होत्या. रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 8 हजार धावा चोपल्या आहेत. रैनाने 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
रैनाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळताना 5528 धावा चोपल्या आहेत. रैना आयपीएलमध्ये सर्वप्रथम 5000 धावा करणारा खेळाडू आहे. त्याने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्याला ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने ओळखले जाते. (former cricketer suresh raina birthday irfan pathan tweet a video making dosa)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: 36 वर्षीय धोनी आणि 24 वर्षांच्या पंड्यामध्ये लागलेली 100 मीटर शर्यत, पाहा कोण जिंकलेलं
इंग्लंडच्या माजी दिग्गजाने पुन्हा साधला भारतावर निशाणा, धवन- लक्ष्मणच्या निर्णयावर म्हणाला…