---Advertisement---

धोनीच्या IPL निवृत्तीबाबत सुरेश रैनाचा खळबळजनक गौप्यस्फोट; वाचून CSK फॅन्सही होतील खूपच खुश

Suresh-Raina-And-MS-Dhoni
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाला 4 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा महेंद्र सिंग धोनी सध्या चर्चेचा धनी ठरत आहे. सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे की, एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम आहे का? तो आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार आहे? आयपीएल 2023च्या एका सामन्यात नाणेफेकीवेळी समालोचक डॅनी मॉरिसन यांनी धोनीला विचारले होते की, “हा तुझा शेवटचा हंगाम आहे का?” यावर धोनीने स्पष्ट नकार दिला होता. तसेच, म्हटले होते की, “हे तुम्ही म्हणत आहात, मी नाही.” असे असेल, तर मग धोनीच्या मनात नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्नही अनेक चाहत्यांना पडला असेल. आता याविषयी धोनीचा माजी सहकारी खेळाडू सुरेश रैना याने भाष्य केले आहे. निवृत्त होण्याबद्दल सुरेश रैनाने धोनीच्या वक्तव्याविषयी मोठा खुलासा केला. रैनाच्या खुलाश्याने चाहत्यांनाही नक्कीच आनंद होईल.

काय म्हणाला रैना?
जिओ सिनेमावर बोलताना सुरेश रैना (Suresh Raina) याने सांगितले की, नुकतीच आयपीएल हंगामादरम्यान झालेल्या भेटीत एमएस धोनी (MS Dhoni) त्याला काय म्हणाला होता. रैनाने सांगितले की धोनी त्याला म्हणाला होता, “मी ट्रॉफी जिंकून आणखी एक वर्षे खेळेल.” मात्र, धोनी स्वत:च म्हणाला आहे की, हा त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा टप्पा सुरू आहे. त्याने असेही म्हटले होते की, “जेव्हा तुमचे वय होते, तेव्हा अनेकदा मंद गतीने काम करू लागता.”

धोनीचे चाहत्यांविषयी भाष्य
धोनीने चेपॉक मैदानातील एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या पाठिंब्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, “खूप काही म्हटले जात आहे. हा माझ्या कारकीर्दीतील अखेरचा टप्पा आहे. मी जितकेही खेळेल. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे सामना पाहण्याची संधी मिळाली आहे. इथे येऊन चांगले वाटत आहे. प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम आणि आपलेपण दिले आहे. मला जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, पण माझी काहीच तक्रार नाहीये.”

आयपीएल 2023मध्ये चेन्नईची कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय करण्याच्या जवळ पोहोचला आहे. संघ सध्या 11 सामन्यात 13 गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. अशात या हंगामाची ट्रॉफी जिंकतात की नाही, हे येणारा काळच सांगेल. (former cricketer suresh raina said ms dhoni told him that he will play in next ipl)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुपरफ्लॉप ठरत असलेल्या रोहितविषयी सेहवागची बेधडक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो गोलंदाजांमुळे नाही, तर…’
बिझनेस माईंड अंबानींचा ‘घाटे का सौदा’ ठरला आर्चर! दोन वर्षात संघाचे झाले नुकसानच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---