येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेपूर्ण भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झालीये. भारतीय संघ 5 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे, त्याआधीच जसप्रीत बुमराह या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता त्याच्या बदली खेळाडूबद्दल भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्टार गोलंदाज बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
चाहत्यांच्या मनात अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत की, जसप्रीत बुमराह (Japsrit Bumrah) याच्या जागी कोणत्या खेळाडूला 15 सदस्यीय संघात सामील केले जाऊ शकते. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. अशामध्ये अंदाज वर्तवले जात आहेत की, मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते?
वसीम जाफरने सांगितले कुणाला मिळू शकते संधी
टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात शमीची निवड करण्यात आली नाहीये. मात्र, त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत चाहरने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. मात्र, चाहरलाही या विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने एका वेबसाईटशी संवाद साधताना बुमराहच्या बदली खेळाडूबद्दल मत व्यक्त केले आहे.
“मला वाटते की, दीपक चाहरला संघात घेतले जाईल. मात्र, मी शमीच्या बाजूने आहे. मी आधीही सांगितले होते की, तो जसप्रीत बुमराहचा सर्वोत्तम बदली खेळाडू असू शकतो. कारण, तो तुम्हाला नवीन चेंडूने विकेट घेऊन देऊ शकतो. तो अखेरच्या षटकातही वाईट गोलंदाजी करत नाही. त्याच्याकडे गतीही आहे आणि अखेरच्या षटकात ती गती गोलंदाजाकडेही असायला पाहिजे. आपण पाहिले आहे की, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांना समस्याचा सामना करावा लागला आहे. जेव्हा ती गती नसते, तेव्हा फलंदाजांसाठी सर्व सोपे होते,” असे जाफर म्हणाला.
शमी आणि चाहरमध्ये कोण सर्वोत्तम?
दुखापतीनंतर चाहर शानदार लयीत दिसत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ज्याप्रकारे प्रदर्शन केले आहे, त्याने शमीच्या चाहत्यांना धक्का लागू शकतो. कारण, असेच काहीसे जाफरच्या वक्तव्यावरून समजते. त्याने संवादादरम्यान बुमराहचा बदली खेळाडू म्हणून दीपक चाहरला पुढे ठेवत म्हटले की, “मला वाटते की, दीपक चाहर संघासोबत जाईल. त्याने कमालीची गोलंदाजी केली आहे. आम्हाला माहिती आहे की, तो नवीन चेंडूसोबत चांगली कामगिरी करतो. तसेच, तो फलंदाजीतूनही संघासाठी योगदान देऊ शकतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 धावांची खेळीही केली होती. तुम्हाला 7व्या आणि 8व्या क्रमांकावर असा खेळाडू पाहिजे. त्यामुळे मला वाटते की, चाहर, बुमराहचा बदली खेळाडू असू शकतो.”
आता बुमराहचा बदली खेळाडू म्हणून संघ व्यवस्थापन कोणाला ऑस्ट्रेलियाला पाठवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानापासून दूर असतानाही बेअरस्टोने नावे केला मानाचा पुरस्कार; हे खेळाडूही बनले मानकरी
रोहितचा प्रश्नच मिटला! विश्वचषकात फ्लॉप ठरताच ‘हे’ 3 खेळाडू घेऊ शकतात त्याची जागा