इंग्लंड क्रिकेट संघाचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला नाही, तरीही ते या संघाकडून खेळतात. नुकताच झिम्बाब्वे क्रिकेट संघाने त्यांचा आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी सिकंदर रझा, ब्लेसिंग मुझाराबानी, रेगिस चकाबवा आणि मिल्टन शुंबा या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तर एका नावाने मात्र चर्चेला सुरूवात झाली आहे.
त्या खेळाडूचे नाव गॅरी बॅलन्स (Gary Ballance). त्याची निवड झिम्बाब्वेच्या टी20 संघात झाली आहे. त्याचा जन्मही झिम्बाब्वेमध्ये झाला. त्याने इंग्लंडकडून 16 वनडे आणि 23 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने इंग्लंडकडून शेवटचा कसोटी सामना 6 वर्षापूर्वी खेळला.
काही वर्षापूर्वी झालेल्या यॉर्कशायरच्या वंशवाद प्रकरणामध्ये अजीम रफीक याच्याशी 33 वर्षीय बॅलन्सचे फारच बिनसले होते. या प्रकरणानंतर बॅलन्सला त्याच्या कारकिर्दीची पुन्हा सुरूवात करण्यास मनाई केली गेली. त्यानंतर क्लबने त्याला एका अटीवर मुक्त केले. तो 2023च्या हंगामातील एकही काऊंटी क्रिकेट सामना खेळू शकणार नाही, अशी ती अट होती.
यादरम्यान अनेक काळ बॅलन्सने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डच्या संपर्कात राहिला. त्याने या बोर्डशी दोन वर्षाचा करार केला आहे. यानुसार तो झिम्बाब्वेच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्येही खेळू शकणार आहे. बॅलन्स म्हणाला, “झिम्बाब्वे क्रिकेटशी, नव्या प्रशिक्षकांशी आणि खेळाडूंची काम करण्यास उत्सुक आहे. झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मला एक रोमांच आणि उत्साह मिळाला आहे. मी मागील खूप काळापासून त्यांच्या संपर्कात होतो.”
बॅलन्सचा जन्म हरारेमध्ये झाला तर त्याचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्याने 2006मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक खेळला असून त्यामध्ये त्याने झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो 2014 ते 2017 दरम्यान इंग्लंडकडून खेळला. यामध्ये त्याने 37.45च्या सरासरीने धावा केल्या. त्यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे.
बॅलन्सने त्याचे पहिले कसोटी शतक लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्ध केले होते. तो कसोटीचे पहिले शतक लॉर्डवर करणारा जोनाथन ट्रॉट आणि ऍंड्र्यू स्ट्रॉस नंतर केवळ तिसराच इंग्लंडचा खेळाडू ठरला होता. ही खेळी त्याने कारकिर्दीच्या दुसऱ्याच सामन्यात केली होती. त्याने दुसऱ्या डावात नाबाद 104 धावा केल्या होत्या.
Ballance in Zimbabwe squad for T20I series against Ireland
Details ????https://t.co/l4chQi1yIe pic.twitter.com/Ppd9L7Zeus
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 4, 2023
आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), गॅरी बॅलेन्स, रेयन बर्ल, तेंडाई चटारा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काईया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधेवेरे, तदिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड एनगारावा, विल्यम्स से विलियम्स, क्रेग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट-सचिनबद्दल हे काय बोलून गेला संगकारा? म्हणाला, “भारतीयांना हे दोघे…”
‘त्याच्यात खूप टॅलेंट मात्र…’, स्वस्तात बाद झालेल्या भारतीय खेळाडूची दिग्गजाने लावली क्लास






