भारत अ संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्यासाठी मोठी संधी निर्माण होताना दिसत आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कारण्याची संधी त्यांना मिळू शकते. आयर्लंडविरुद्ध भारताला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची असून 18 ऑगस्ट रोजी ही मालिका सुरू होणार आहे.
येते काही महिने भारतीय संघासह जागतिक क्रिकेटसाठी महत्वाचे असणार आहे. आशिया चषक, आशियाई गेम्स आणि आयसीसी वनडे विश्वचषक अशा महत्वाचा मालिका यादरम्यान खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आयर्लंडं दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) अशा प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. सोबतच संघाचा सपोर्ट स्टाफ देखील विश्रांतीवर आहे.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), गोलंदाजी प्रशिक्ष पारस म्हांब्रे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड विश्रांतीवर आहेत. अशात आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण (VVS lakshman) मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडती, अशी पूर्ण शक्यता होती. पण लक्ष्मण यांनीह ऐन वेळी माघार घेतल्याचे दिसते. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार युवा खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या खास कॅम्पसाठी लक्ष्मण बेंगलोरमध्ये थांबणार आहे. अशात बातम्या समोर आल्या की भारतीय संघ सपोर्ट स्टाफच्या अनुपस्थितीत आयर्लंड दौरा करणार. पण शनिवारी (12 ऑगस्ट) याबाबत महत्वाची माहिती आली.
सितांशु कोटक बेंगलोरच्या एनसीएमध्ये फलंदाजी प्रशिक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी भारत अ संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यात देखील ते भारतासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारू शकतात. संघातील मुख्य खेळाडू विश्रांतीवर असले, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहे. पुनरागमनाच्या सामन्यात बुमराह कर्णधार म्हणून खेळताना दिसेल. (Former India A head coach Sitanshu Kotak is set to become team India’s head coach for the upcoming series against Ireland in the absence of VVS Laxman.)
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
महत्वाच्या बातम्या –
मुकेश कुमार तिन्ही फॉरमॅटसाठी रेडी! वर्कलोडबाबत गोलंदाजी प्रशिक्षकांच्या डोक्यात विचार सुरू
पहिले रोहित आता विराट! आपल्या पदार्पणातच तिलकला दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी