भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-२० मालिकेनंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत एक असा खेळाडू डावाची सुरुवात करू शकतो, ज्याचा खूप कमी लोकांना कल्पना असेल. या खेळाडूचे नावर प्रियांक पांचाल (Priyank Panchal) आहे. रोहितसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मयंक अगरवाल, शुबमन गिल आणि प्रियांक पांचाल या तिघांमध्ये शर्यत आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) राजपूत यांनी याविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडल्या जाणाऱ्या प्लेइंग इलेव्हनविषयी लालचंद रजपूत म्हणाले की, “रोहित शर्मासोबत मयंक अगरवाल किंवा प्रियांक पांचाल सलामी करू शकतात. प्रियांक पांचालसोबत सलामी करण्यामागेच एक मोठे कारण हे आहे की, त्याने फक्त देशांतर्गत क्रिकेटमध्येच नाही, तर भारतीय ए संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही त्याने चांगले प्रदर्शन केले होते.”
त्याव्यतिरिक्त श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका मायदेशात खेळली जात असल्यामुळे भारतीय संघ प्रयोग करू शकतो, असेही लालचंद राजपूत पुढे बोलताना म्हणाले.
अलिकडे भारतासाठी नियमित सलामीवीर बनलेल्या केएल राहुलविषयी बोलताना लालचंद राजपूत म्हणाले की, केएल राहुल आतापर्यंत जरी सलामीवीराच्या रूपात खेळत आला असला, भविष्यात त्याला मध्यक्रमात उतरवले जाऊ शकते. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संघातून बाहेर केल्यामुळे मध्यक्रमात जागा तयार झाली आहे. म्हणजेच जर राहुल मध्यक्रमात आला, तर सलामीवीरासाठी संधी तयार होऊ शकते.
सध्या झिम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि १९८० च्या दशकात भारतासाठी खेळलेले लालचंद राजपूत पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक संघाचा एक काळ असतो. एक वर्तुळ असते, ज्यात ते चांगले प्रदर्शन करतात. जेव्हा हे वर्तुळ पूर्ण होते, तेव्हा संघात बदल करण्याची गरज असते. भारतीय संघही त्यांचा हा वर्तुळ पूर्ण करण्याच्या जवळ आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन आता सिनियर खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंच्या शोधात आहे. एक चांगला संघ नेहमी असेच करतो, जेणेकरून ते स्वतःचा विजयरथ पुढे चालू ठेऊ शकतील.
श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी निवडलेले भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.
महत्वाच्या बातम्या –
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?
संजू सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी निवड निश्चित? कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतोय पाहा
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी२० पूर्वी सुनील गावसकरांना मोठा मान; विशेष घटनेनंतर होणार सामना सुरू