---Advertisement---

“त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही” माजी दिग्गजाचे रोहितबद्दल मोठे वक्तव्य!

---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 4 कसोटी सामने गमावले आहेत. त्यामुळे रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी रोहितचे समर्थन केले आहे.

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी सोमवारी (9 नोव्हेंबर) सांगितले की, रोहित शर्माच्या पुनरागमनाच्या क्षमतेवर शंका घेऊ नये, तसेच टीका झालेल्या भारतीय कर्णधाराला कारकिर्दीच्या या टप्प्यावर स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही. ॲडलेडमधील पिंक-बॉल कसोटीत, रोहितने मधल्या फळीत फलंदाजी करताना 3, 6 अशा धावा केल्या. दरम्यान चाहत्यांनी तसेच माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली.

दिल्ली गोल्फ क्लबमधील एका कार्यक्रमादरम्यान कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, “त्याला (रोहित शर्मा) स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही. तो अनेक वर्षांपासून हेच करत आहे, त्यामुळे आपण कोणावरही संशय घेऊ नये, मी त्याच्यावर संशय घेणार नाही, मला आशा आहे की तो फॉर्ममध्ये येईल. कारण हे महत्वाचे आहे.”

पुढे बोलताना कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, “1-2 कामगिरीच्या आधारे तुम्हाला कोणाच्या कर्णधारपदावर शंका असेल, म्हणजे 6 महिन्यांपूर्वी जेव्हा त्याने टी20 विश्वचषक जिंकला, तेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारला नसता. त्याची क्षमता आणि प्रतिभा जाणून, तो परत येईल, तो जोरदार परत येईल.”

महत्त्वाच्या बातम्या-

तिसऱ्या कसोटीत भारताचे वाढणार टेन्शन? ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाचे होणार पुनरागमन
दोन भाऊ इंग्लंडसाठी खेळतात, तिसऱ्या भावानं देश बदलला! या संघाकडून पदार्पण करणार
कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक झेल घेणारे टाॅप-5 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---