Ajay Jadeja On Pakistan Caoch: मागील महिन्यात 19 नोव्हेंबर रोजी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा शेवट झाला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाने खूपच खराब प्रदर्शन केले. बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ 9 सामन्यातील फक्त 4 सामने जिंकू शकला. त्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले. यानंतर कर्णधारासह संघावर टीकास्त्र डागण्यात आले. यानंतर बाबरने तिन्ही प्रकारातील संघाचे कर्णधारपद सोडले. पाकिस्तानने गमावलेल्या 5 सामन्यांपैकी एक सामना अफगाणिस्तानविरुद्ध हारला होता. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा अफगाणिस्तानने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वातील अफगाणी संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिला, ज्याचा मार्गदर्शन भारताचा माजी फलंदाज अजय जडेजा होता.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघाने आपल्या संघात आणि प्रशिक्षकांमध्ये मोठे बदल केले. अशात अजय जडेजा (Ajay Jadeja) याला विचारण्यात आले की, त्याला पाकिस्तानचा प्रशिक्षक बनायला आवडेल का? यावेळी तो म्हणाला की, “मी तयार आहे.” स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला, “मी अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत माझा अनुभव शेअर केला आहे. मला वाटते की, पाकिस्तान क्रिकेट संघ एकेकाळी अफगाणी संघाप्रमाणेच होता. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यापुढे हवे ते बोलू शकता.”
खरं तर, बाबर आझम (Babar Azam) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील पाकिस्तान (Pakistan) संघाचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विश्वचषकानंतर संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलला. त्यांनी शान मसूद याच्याकडे कसोटी संघाचे, तर शाहीन आफ्रिदीला टी20 संघाचा कर्णधार बनवले. तसेच, कोचिंग स्टाफमध्ये मोहम्मद हाफिज याला क्रिकेट संचालक म्हणून नेमले, तर माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाज याच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद सोपवले.
https://twitter.com/sau_desai/status/1731654015224791187
अजय जडेजाची कारकीर्द
अजय जडेजा याने त्याच्या कारकीर्दीत भारतीय संघाकडून 15 कसोटी आणि 196 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 576 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याच्या बॅटमधून 37.47च्या सरासरीने 5359 धावांचा पाऊस पडला आहे. त्यात 6 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश होता. (former indian cricketer ajay jadeja on becoming coach of pakistan cricket team)
हेही वाचा-
डॅनियल वॅट आणि नेट-सायव्हर ब्रांट यांच्या ताबडतोड खेळीनंतर सोफीचा कहर, महिला टी-20त इंग्लंडचा भारतावर विजय
क्रिकेट ऑस्ट्रेलिया वॉर्नरच्या बाजूने! सलामीवीरा फलंदाजाला टार्गेट करणाऱ्या जॉनसनवर मोठी कारवाई