भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, त्याने विश्वचषक 2019 स्पर्धेदरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अन्यायामागे बीसीसीआयचे धक्कादायक गुपीत सांगितले आहे. रायुडूने बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानंतर आता थेट त्याच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रायुडू लवकरच सक्रिय राजकारणात सहभागी होऊ शकतो.
रायुडू काही दिवसांपूर्वी संपलेल्या आयपीएलनंतर थेट चे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची भेट घेण्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. रायुडू आपल्या मूळ गावाच्या विकासासंदर्भातील चर्चा करण्यासाठी रेड्डी यांच्याकडे गेल्याचे सांगण्यात आलेले. मात्र, सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार या दोघांची चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून, रायुडू जगन मोहन यांच्या व्यक्तिमत्त्वामूळे प्रभावीत झाल्याचे सांगण्यात येते. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी रायुडू जगन मोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवू शकतो.
रायुडूने आयपीएलसह भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. यानंतर आता तो विदेशातील लिंग खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत तो खेळताना दिसेल. या स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीच्या टेक्सास सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघात त्याच्या व्यतिरिक्त फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, डेव्हिड मिलर व डेवॉन कॉनवे असे नामांकित क्रिकेटपटू असतील.
(Former Indian Cricketer Ambati Rayudu Might Join Politics Will Join YSR Congress In Leadership Of Jagan Mohan Reddy)
महत्वाच्या बातम्या-
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
संतापलेल्या आफ्रिदीचा पीसीबीला घरचा आहेर; अहमदाबाद खेळपट्टीविषयी म्हणाला, ‘तिथं काय आगीचा पाऊस पडतोय?’