2024 मध्ये भारतीय संघाला घरच्या मालिकेत न्यूझीलंडविरूद्ध 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला, तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा धुव्वा उडवला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठे पाऊल उचलत संघाच्या स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. यानंतर, रोहित शर्मा (Rohit Sharma) शेवटच्या रणजी सामन्यात मुंबईकडून खेळला, तर विराट कोहली (Virat Kohli) (30 जानेवारी) पासून सुरू झालेल्या रणजी सामन्यात दिल्लीकडून रेल्वेविरूद्ध खेळत आहे.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी एक मोठे विधान केले आहे की, खेळापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी नाही. त्यांनी बीसीसीआयला एक सल्लाही दिला.
रोहित आणि कोहलीचे नाव न घेता मोहिंदर अमरनाथ म्हणाले, “ज्या खेळाने तुम्हाला घडवले त्यापेक्षा मोठा सुपरस्टार दुसरा कोणी नाही. तुम्ही जिथून खेळायला सुरुवात केली होती तिथून तुम्हाला त्या मैदानावर वेळ घालवावा लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला खेळापेक्षा मोठे समजते तेव्हा असे घडते. जेव्हा एखादी व्यक्ती विचार करते की मी स्वतः आहे तेव्हा अशा गोष्टी दिसतात. खेळाडू येत राहतील आणि जात राहतील, खेळ काळाबरोबर चालू राहील.”
पुढे बोलताना अमरनाथ म्हणाले की, “संघाच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी, कठोर निर्णय घेतले पाहिजेत आणि प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तीचे केले पाहिजे, मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो, ते अधिक चांगले होईल. भारतीय संघ भारतात चांगली कामगिरी करतो यात शंका नाही. पण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील कामगिरी चांगली असायला हवी होती, जी सध्या तशी नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs SL; मिचेल स्टार्कने रचला इतिहास, 700 विकेट्स पूर्ण करत केला खास रेकाॅर्ड
चौथ्या टी20 सामन्यासाठी स्टार फलंदाजाचे पुनरागमन, जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग 11
“कोहलीला गोलंदाजी द्या” अरूण जेटली स्टेडियमवर चाहत्यांची मागणी, पाहा VIDEO