वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे सलामीवीर शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी अलीकडेच द्विशतक झळकावले होते. यानंतर पृथ्वी शॉ असूनही हे दोघे टी20त सलामीला फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाची पहिली पसंत होते. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 2 सामन्यात गिल आणि किशन सपशेल फ्लॉप ठरले. आता अपेक्षा केली जात आहे की, बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पृथ्वीला अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानेही यावर आपले मत मांडले आहे.
माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) याला माध्यमांशी बोलताना प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असो होता की, भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसऱ्या टी20 सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) याच्या जागी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला संधी मिळाली पाहिजे का? यावर बोलताना तो म्हणाला की, “होय, मला वाटते की, याबाबत संघ व्यवस्थापनाने विचार केला पाहिजे. आपण पाहिले आहे की, संघ व्यवस्थापन जास्त काही बदल करत नाही, पण कदाचित याबाबत संघ लक्ष घालेल.”
भारतीय संघ मालिका जिंकेल की, नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना जाफर म्हणाला की, “मी यापूर्वीही भाकीत केले होते की, भारत ही मालिका 2-1ने जिंकेल. दुसऱ्या सामन्यात भारत विजय मिळवल्यानंतर ही लय कायम ठेवेल.”
‘वॉशिंग्टन सुंदर आहे खरा हिरो’
वसीम जाफर याचा असा विश्वास आहे की, लखनऊमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने ज्याप्रकारे सूर्यकुमार यादव याच्यासाठी त्याची विकेट गमावली होती, तो सामन्याचा महत्त्वाचा क्षण होता. त्याने सुंदरच्या या निर्णयाची जोरदार प्रशंसा केली. सामन्यात सुंदर 10 धावा करून धावबाद झाला होता. सूर्याने 31 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (former indian cricketer wasim jaffer said prithvi shaw should get a chance in place of shubman gill in the third t20 match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊमध्ये आव्हान गाठताना भारताच्या नाकी नऊ, पंड्याच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयकडून पीच क्यूरेटरची हाकालपट्टी!
अटीतटीच्या सामन्यात पंड्याने ‘तो’ निर्णय घेताच भडकला गौतम गंभीर, काय म्हणाला वाचाच