जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा जबरदस्त फटका भारताला ही बसला आहे. त्यामुळे,सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूही मदत करण्यासाठी पुढे आले होते. या महान कार्यात आता माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील हातभार लावायचे ठरवले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खूप कमी वेळेस तो मैदानावर क्रिकेट खेळताना दिसून आला आहे. काहीवर्षांपूर्वी त्याने ‘युवीकॅन’ नावाचे फाऊंडेशन सुरू केले होते. या फाऊंडेशनद्वारे त्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यात आता आणखी एका महान कार्याची भर पडत आहे. त्याच्या फाऊंडेशन तर्फे, कोविड-१९ रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या विविध रुग्णालयांमध्ये १००० बेड देण्यात येणार आहे.
युवीकॅन फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे की, वन डिजिटल एंटरटेनमेंट सोबत मिळून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मूळ उद्देश असा असणार आहे की, ऑक्सिजन सेवा, वेंटीलेटर, बायपीएपी मशिन आणि कोविड १९ रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारी इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे बसविण्यासह सरकारी, लष्करी, स्वायत्त आणि सेवाभावी सेवा रुग्णालयांची क्षमता वाढविणे.
The 2nd wave of COVID has been devastating. Countless lives have been lost & thousands have had to struggle. #Mission1000Beds is an effort to enhance the critical care capacity of hospitals. Join our fight so that we can save valuable lives. @YouWeCan https://t.co/YFDWJyYDKE
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 1, 2021
विराट कोहलीनेही केली होती मदत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या पती-पत्नीने ७ मे रोजी जनतेला निधी गोळा करण्यासाठी आव्हान केले होते. त्यांनी सात दिवसात सात कोटी रुपये देणगी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु त्यांच्या या मोहिमेला भरपूर यश मिळाले आहे. त्यांना अवघ्या सात दिवसात तब्बल ११ कोटी रुपये देणगी मिळाली होती. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत सर्वांचे आभार मानले होते.
याशिवाय रिषभ पंत, सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन अशा अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कमीतकमी २ षटकार मारत सर्वाधिक आयपीएल डाव खेळणारे फलंदाज, यादीत भारतीयांचा बोलबाला
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले
‘कॅप्टनकूल’ धोनीच्या तालमीत तयार झालेत ‘हे’ वस्ताद, आज आहेत विविध संघांचे प्रशिक्षक