रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाच्या टी20 विश्वचषक जिंकून जगभारत भारताचा झेंडा उंचावला आहे. रोहित आणि कंपनीने 17 वर्षापासूनचा टी20 विश्वचषकाचा दुष्काळ संपवला. टी20 विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष करतानाचा चाहत्यांना निराशा देखील पदरात पडल्या कारण विश्वचषक जिंकताच विराट कोहलीने टी20 मधून निवृत्ती झाहीर केली, तर सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा देखील टी20 क्रिकेटला रामराम ठोकला. तर दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. तर या नंतर टी20 मध्ये वरच्या फळीतील फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माची जागा कोण घेणार? याची सर्वत्र चर्चा होत आहे.
भारताचा माजी विस्फोटक विरेंद्र सेहवागने पुढील काळात जागा कोण घेणार आणि येत्या टी20 विश्वचषक 2026 बद्दल आपले मत व्यक्त केला आहे. रोहित शर्मा नंतर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याच्या जागी शुबमन गिलला पहायला आवडेल, असं तो म्हणाला. क्रिकबझशी बोलताना, विरेंद्र सेहवाग म्हणाला, शुबमन गिल भारतीय संघाचा तिन्ही फाॅरमॅट मध्ये कर्णधाराची भूमिका बजावण्याची क्षमता आहे. तो युवा असल्याने तो दीर्घ काळासाठी तो भारतीय संघाचे नेतृत्व करु शकतो. असंही तो म्हणाला. शिवाय शुबमन गिल नंतर टी20 मध्ये कर्णधार पदासाठी हार्दिक पांड्याचे नाव समोर येत आहे.
वास्तविक, यंदाच्या आयपीएल मध्ये शुबमन गिलने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले आहे. त्याची कर्णधाराची कामगिरी उल्लेखनीय नसली तरी व्यक्तिक कामगिरी समाधानकारक होती. आयपीएल मधील 14 सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले आहे ज्यामध्ये 5 सामन्यात त्याला विजय मिळवता आले तर 7 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर 2 पावसामुळे अनिर्णित राहिल्या. दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. झिम्बाब्वे दाैऱ्यावर भारत 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या विक्ट्री परेडनंतर मुंबईकरांचे हाल, मरीन ड्राइव्हवरून निघाला तब्बल इतके किलो कचरा!
नव्या कर्णधारासह टीम इंडिया आजपासून लढणार, सलामी जोडीवर असणार सर्वांच्या नजरा
थालाची हवा; वाढदिवासाआधी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ! इथे लावला चक्क 100 फुटी कट आऊट