भारताचा अलीकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव झाला. यानंतर आता भारत विरूद्ध ऑस्टेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक दौऱ्यात पारंपारिक शैलीचे क्रिकेट खेळू शकणारे केएल राहुल (KL Rahul) किंवा अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) यांच्यासारख्या एखाद्या खेळाडूची भारताला गरज भासेल, असे मत माजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) केले.
कसोटी संघात अनुभवी चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) स्थान आहे. असे मत उथप्पाने व्यक्त केले. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी शॉट खेळणाऱ्या खेळाडूंनी भरलेल्या भारतीय फलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध 0-3 अशा लाजिरवाण्या पराभवानंतर भारतावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे.
‘जिओ सिनेमा’ आणि ‘स्पोर्ट्स 18’ तज्ञ रॉबिन उथप्पाने ऑनलाइन मीडियाशी बोलताना सांगितले की, “आम्हाला बचावात्मक खेळाडूची गरज आहे. सध्या केएल राहुल आणि अभिमन्यू इस्वरन हे खेळाडू ही भूमिका करू शकतात. ही जबाबदारी घेऊ शकेल असा दुसरा खेळाडू मला दिसत नाही. शुबमन गिलसारख्या खेळाडूंसह प्रत्येकाला सकारात्मक, आक्रमक पद्धतीने खेळणे आणि वेगाने धावा करणे आवडते. तो एक नैसर्गिक स्ट्रोक खेळाडू आहे आणि जर तुम्ही त्याला हळू खेळायला सांगितले तर त्याला ते आवडणार नाही.”
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु यावेळी हा अनुभवी खेळाडू भारतीय संघाचा भाग नाही. त्यावर उथप्पा म्हणाला, “केएल राहुल आणि अभिमन्यू इस्वरन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, तर बाकी सगळे त्यांच्याभोवती आहेत. खरे सांगायचे तर, मला अजूनही वाटते की पुजारासारख्या खेळाडूला कसोटी संघात स्थान आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयची 6 तास मॅरेथाॅन मीटिंग, गंभीर, रोहित, आगरकर निशाण्यावर
IND vs SA; झंझावाती शतक झळकावून संजू सॅमसनने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
मरता-मरता वाचला हा दिग्गज क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियात घडला जिवघेणा अपघात!