आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित करण्यात आलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. परंतु उभय संघाना या सामन्यासाठी रणनिती बनवण्यात अजून फार दिवस शिल्लक आहेत. तत्पुर्वी आजी-माजी क्रिकेटपटू या सामन्याच्या दृष्टीने वेगवेगळे सल्ले देत आहेत. माजी भारतीय फिरकीपटू मनिंदर सिंग यानेही भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे.
भारतीय संघाचे अनुभवी अष्टपैलू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांचा दमदार फॉर्म आणि त्यांची कामगिरी अतिशय विलक्षण राहिली आहे. त्यामुळे संघ प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात या दोन्ही अष्टपैलूंना संधी देण्याचा सल्ला मनिंदर याने दिला आहे.
अंतिम सामन्यात ठरतील प्रभावी
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मनिंदरने म्हटले की, “जर मी भारताच्या संघ व्यवस्थापनाचा भाग असतो तर मी अश्विन आणि जडेजा या दोघांनाही खेळवले असते. ते अंतिम सामन्यात खूप प्रभावी ठरतात ठरू शकतात. जस जसा कसोटी सामना पुढे जाईल तस तशी खेळपट्टी खराब होईल. मी इंग्लंडमधील माझ्या मित्रांना बोलत असतो. त्यांनी मला सांगितले की, सध्या इंग्लंडमधील गरमीचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे खेळपट्टीवर ओलाव्याचा जास्त परिणाम होणार नाही आणि फिरकीपटूंना मदत मिळेल.”
दोघांच्याही प्रदर्शनात झाल्या आहेत बऱ्याच सुधारणा
अश्विन आणि जडेजा अष्टपैलू असल्याकारणाने ते फिरकी गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजीही करू शकतात. याबाबत बोलताना मनिंदर म्हणाला की, “जडेजा सध्या असाधारण फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. मागील काही सामन्यात दमदार खेळी केल्याने त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हे त्याच्या गोलंदाजीतूनही दिसत आहे.”
“अश्विन हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यानेही आपल्या प्रदर्शनात खूप सुधारणा केल्या आहेत. तो कोणत्याही खेळपट्टीवर विकेट्स घेऊ शकतो. आता त्याच्या गोलंदाजीतून एकप्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे, जो त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला परदेशी दौऱ्यांमध्ये दिसत नव्हता,” असे अश्विनबद्दल बोलताना मनिंदरने सांगितले.
कसोटी क्रिकेटमध्ये ३५ सामन्यात ८८ विकेट्स घेणाऱ्या मनिंदरचा हा सल्ला कर्णधार कोहली मार्गी लावेल की नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी विस्डेनने निवडली भारताची प्लेइंग XI, अनुभवी गोलंदाज बाहेर
शानदार कारकिर्द अन् क्रिकेटची उत्तम जाण असूनही गावसकर प्रशिक्षकपदापासून दूर? वाचा कारण
ब्रॉडने षटकार मारत दाखवला धाक, दुसऱ्याच चेंडूवर बोल्ड करत गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर