---Advertisement---

भारताचे दिग्गज विकेटकिपर, ज्यांनी इंग्लंडला बनवले घर; निवृत्तीनंतर वादग्रस्त वक्तव्यांनी राहिले चर्चेत, वाचा त्यांच्याबद्दल

On: शुक्रवार, फेब्रुवारी 25, 2022 1:32 PM
Farokh-engineer
---Advertisement---

भारतीय संघाचे (Team India) माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज फारूख इंजिनीयर (Farokh Engineer) आज (२५ फेब्रुवारी) त्यांचा ८४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९३८ मध्ये मुंबईत (तेव्हाची बॉम्बे) झाला होता. त्यांनी १९६१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांची कारकिर्दी पुढे खूप काळ चालली. त्यांचा काळातील दिग्गज यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये इंजिनीयर यांचे नाव घेतले जात असायचे.

२३ जानेवारी १९७५ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणारे फारूख इंजिनीयर यांनी कारकिर्दीत ४६ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ३१.०८ च्या सरासरीने २६११ धावा केल्या. यामध्ये त्यांचे दोन शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्यांची सर्वाधिक धावसंख्या १२१ धावा होती. यष्टीरक्षकांच्या भूमिकेत त्यांनी ८२ खेळाडूंना बाद केले, यामध्ये ६६ झेलबाद, तर १६ स्टंपिंगचा समावेश आहे.

इंजिनीयर यांनी जुलै १९७४ मध्ये एकदिवसय पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या पाच सामन्यात त्यांनी ११४ धावा केल्या. शेवटचा एकदिवसीय सामना त्यांनी जून १९७५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांच्या कारकिर्दीचा विचार केला, तर इंजीनियर एकूण ३३५ सामने खेळले आणि यामध्ये १३,४३६ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर एकूण १३ शतके आणि ६९ अर्धशतके आहेत.

क्रिकेटशिवाय इंजीनियर यांना विमान चालवण्याचीही आवड होती. त्यांनी पाइपर चेरोक आणि टायगर मॉथ यासारखी लहान विमाने उडवली आहेत. परंतु, जास्त उंचीवर विमान उडवण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. त्याव्यतिरिक्त त्यांना सायकलिंगचीही चांगलीच आवड होती. एकदा ते मुंबईहून पुण्यापर्यंत सायकलिंग करत आले होते.

क्रिकेट कारकिर्दीत इंजीनियर इंग्लंडचा काउंटी क्रिकेट क्लब लंकाशायरसाठीही खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी लंकाशायरमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. ते त्याठिकाणी उपाध्यक्ष बनले होते. निवृत्तीनंतरचा जास्त वेळ त्यांनी मॅनचेस्टरमध्ये घालवला. त्याठिकाणी राहण्यासाठी त्यांना घर आणि गाडी दिली गेली होती.

तसेच काही दिवसांपूर्वी इंजिनियर यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माविषयी विवादास्पद वक्तव्य केले होते. तसेच भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. अशा अनेक कारणामुंळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२०त शानदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे कर्णधार रोहित नाराज

एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढे, शौनक सुवर्णा यांचा सनसनाटी विजय

क्रिकेटच्या डॉनने २१ वर्षांपूर्वी घेतलेला अखेरचा श्वास, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---