येत्या २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या कसोटी मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाला विजय रचण्याची सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकली नाहीये. त्यामुळे कोहली अँड कंपनीने जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या मालिकेत कुठला संघ बाजी मारेल याबाबत भविष्यवाणी करायला सुरूवात केली आहे. दरम्यान माजी यष्टिरक्षक फलंदाजानेही कुठला संघ मालिका जिंकेल याबाबत भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात जाऊन सलग दोन वेळेस पराभूत केले होते. तर इंग्लंड संघाला ही २ कसोटी मालिकेत धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेलाही त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज सबा करीम (Saba Karim) यांच्यामते भारतीय संघातील खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे की, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करू शकतो.(Saba Karim statement)
एका क्रिकेट संकेतस्थळाशी चर्चा करताना सबा करीम यांनी भविष्यावणी करत म्हटले की, ” भारतीय संघ २-० ने किंवा २-१ ने कसोटी मालिकेत विजय मिळवू शकते. तर वनडेमध्ये आपण आधीपासूनच दक्षिण आफ्रिका संघापेक्षा श्रेष्ठ आहोत.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जशी कामगिरी केली होती, त्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की, हा किती मजबूत संघ आहे. आमचे ५ ते ६ प्रमुख खेळाडू संघात नव्हते तरीदेखील आपण त्या मालिकेत विजय मिळवला होता. यावरूनही तुम्ही अंदाज घेऊ शकता की,आपले राखीव खेळाडूही किती मजबूत आहेत. यावेळी मी आशा करतो की, आपल्याकडे एक सुवर्णसंधी आहे. कारण संघातील खेळाडूंकडे चांगला अनुभव आहे. यासह आपले युवा खेळाडू देखील अप्रतिम आहेत.
असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर
ऍडलेड कसोटीत ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बांधले ब्लॅक आर्म बँड, कारण ऐकून कोसळेल रडू