रविवार (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022 मधील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ गतविजेता तसेच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत उतरणार आहे. 2018 मध्ये झालेल्या अखेरच्या आशिया चषकात भारत विजेता ठरला होता. भारत पाकिस्तान यांच्यातील या हाय व्होल्टेज सामन्याविषयी अनेक चर्चा होत असताना, सामाजिक सलामीवीर व क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा याने एक मोठे विधान केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबई येथे होईल. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ जिंकतो असे आकडे सांगतात. येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना दिसतो. मात्र, भारतीय संघाने नाणेफेक गमावली तरी, भारतीय संघ सामना जिंकणार असल्याचे चोप्रा याने म्हटले. एका कार्यक्रमात बोलताना चोप्रा म्हणाला,
“दुबईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना पोषक असे थोडेफार गवत दिसते. त्यामुळे वेगवान गोलंदाज इथे अधिक चांगली गोलंदाजी करू शकतात. मात्र, पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा दुखापतग्रस्त असल्याने, भारतीय संघाचे पारडे जड आहे. पाकिस्तान ‘नाणेफेक जिंका सामना जिंका’ या गोष्टीवर विश्वास ठेवत असला तरी, शेवटी भारतात नाणेफेक गमावल्यानंतरही सामना जिंकण्याची क्षमता आहे.”
भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान या मैदानावर अखेरचा सामना 2021 टी20 विश्वचषकात झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला दहा गड्यांनी मोठा पराभव पत्करावा लागलेला. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. भारत व पाकिस्तान व्यतिरिक्त या गटात पात्रता फेरी जिंकून आलेल्या हॉंगकॉंगचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सध्याच्या काळात आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे!’ विराट कोहलीने बाबरवर केला कौतुकांचा वर्षाव
VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी