आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champion’s Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. पण आता जय शाह (Jay Shah) (1 डिसेंबर) पासून आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ही बातमी येताच चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारत पाकिस्तानात येणार असल्याची हमी दिली आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
भारतीय नियामक मंडळ (BCCI) भारताला पाकिस्तानात लावू इच्छित नाही अशा अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताला आपला खेळ तटस्थ ठिकाणी खेळायचा आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
जय शाह (Jay Shah) आयसीसी (ICC) अध्यक्ष बनल्यानंतर भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचा अंदाज अनेक चाहत्यांनी बांधला होता. पण यानंतर दुसरीकडे पाकिस्तानच्या अपेक्षा दुपटीने वाढल्या आहेत. याचे कारण पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने (Rashid Latif) सविस्तरपणे सांगितले आहे.
‘कॉट बिहाइंड’ या यूट्यूब चॅनलवर बोलताना रशीद लतीफ (Rashid Latif) म्हणाला, “जय शाह यांची बिनविरोध निवड झाली असेल तर याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (PCB) पाठिंबा दिला आहे. मला वाटते की भारत पाकिस्तानात न जाण्याच्या घोषणेवर ते स्वाक्षरी करतील असे होणार नाही. मला वाटते की भारत पाकिस्तानमध्ये जाणार आहे, याची 50 टक्के खात्री झाली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? आयपीएल 2025 पूर्वी चर्चांना उधाण
“विराट कोहलीशिवाय आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकू शकलो नसतो!”, माजी खेळाडूनं स्पष्टच सांगितलं
“भारतीय संघाची काॅपी करा” माजी खेळाडूचा पाकिस्तानला टोला