भारत आणि श्रीलंका संघात एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली असून भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. यानंतर आता या दोन्ही संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या टी२० मालिकेचा पहिला सामना २५ जुलै रोजी झाला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला १६४ धावांचे लक्ष्य दिले होते. तर श्रीलंकेला फक्त १२६ धावा करता आल्या असून भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळविला आहे. श्रीलंकेच्या प्रदर्शनामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमिज राजा नाराज झाला असून त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.
रमिज राजा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “जेव्हा भारतीय संघाने १६४ धावा केल्या तेव्हा त्यांना कुठे ना कुठे आशा होती की ते हा सामना जिंकू शकतील. कारण श्रीलंका संघाकडून चुका करण्याची अपेक्षा करू शकतो. संघाला फक्त १-२ चांगल्या भागीदारींची गरज होती आणि त्यातील एक फलंदाजाला सामना जिंकण्यासाठी ७० धावा कराव्या लागत होत्या. परंतु श्रीलंका संघाजवळ रणनीती अजिबात नव्हती.”
रमिज राजा पुढे म्हणाला की, “जर तुम्ही घरच्या मैदानावर साध्या १६० धावांही करू शकत नाही, तर तुम्ही कोणत्या मैदानावर करणार? नव्या खेळाडूंना पराभवाच्या वातावरणामध्ये घेऊन येणे संघासाठी धोकादायक आहे. यामुळेच श्रीलंका संघाने भारतीय संघासाठी आव्हानात्मक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची तयारी सुरू करणे महत्वाचे आहे. ”
रमिज राजाने श्रीलंका संघावर टीका करण्याबरोबरच भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे खूप कौतुक देखील केले आहे. रमिज राजा म्हणाला की, “सुर्यकुमारला पाहिल्यानंतर असे वाटतच नाही की तो भारतीय संघासाठी एक नवीन खेळाडूच्या रूपामध्ये संघात आला आहे.” त्याचबरोबर रमिज राजाने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे देखील कौतुक केले.
भारत आणि श्रीलंका संघामधील दुसरा टी२० सामना आज (२७ जुलै) होणार आहे. या सामन्यात श्रीलंका संघ कशी कामगिरी करेल? हे पाहण्यासारखे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलंबो टी२०त ‘मांकडिंग’, दिपक चाहरची श्रीलंकेच्या फलंदाजाला चेतावणी; बघा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाने काढला पराभवाचा वचपा, ११७ चेंडू बाकी असतानाच विंडीजवर मात; वनडे मालिकाही जिंकली