पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम गेल्या वर्षीपासून चांगल्या लयीच्या शोधात आहे. तो मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये मोठी खेळी करण्यासाठी झुंजताना दिसत आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यात दुसरी कसोटी खेळली जात आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. माजी खेळाडूंनी बाबर आझमसह इतर फलंदाजांन धारेवर धरले होते. त्यानंतर बाबर आझमचा फ्लॉप शो दुसऱ्या कसोटीतही कायम राहिला.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 77 चेंडूत 31 धावा करून मैदानाबाहेर पडला. तर दुसऱ्या डावात 18 चेंडूत 11 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. या खराब फॉर्मचा परिणाम त्याच्या आयसीसी क्रमवारीवरही झाला आहे. आता बाबर आझम क्रमवारीत नवव्या क्रमांकावर घसरला आहे.
त्याच्या या फोल कामगिरीमुळे आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रशीद लतीफने बाबर आझमबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रशीद लतीफ म्हणाला की, बाबर आझमचे डोके शांत नाही, तो वीरेंद्र सेहवागसारखा आहे, ज्याचा फॉर्म एकदा गेला की मोठ्या कष्टाने परत येतो. तो म्हणाला की, बाबर आझमचे खेळावर लक्ष नाही, तो बाहेरच्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे, त्याचे शॉट सिलेक्शन बिघडले आहे. टी20 आणि वनडे फॉरमॅटमुळे त्याने मोठे फटके मारण्याचे प्रमाण वाढवले आहे. बाबर आझमला कसोटी क्रिकेटचे स्वरूप समजत नाहीये. त्याचा मेंदू काम करत नसल्याचेही त्याने म्हटले आहे.
बाबर आझमच्या खराब फलंदाजी शैली आणि फॉर्मवर राशिद लतीफ पुढे म्हणतो की, तो चुकीचा सराव करत आहे. हे सर्वजण लाइड आर्मने सराव करतात, या हातामध्ये 2 नॅनो सेकंदांचा विलंब होतो. याशिवाय रशीद लतीफने फलंदाजी तंत्राचे उदाहरण दिले. सचिन तेंडुलकरचे तंत्र उत्कृष्ट होते. त्यालाही कधी कधी खराब फॉर्मचा सामना करावा लागला आहे, पण तो लवकरच त्यातून बाहेरही येत असायचा. मात्र वीरेंद्र सेहवाग हे करू शकत नव्हता. वीरेंद्र सेहवागचा खराब फॉर्म सुरू झाला तेव्हा तो बराच काळ सुरू राहिला. बाबर आझमच्या बाबतीतही तेच घडत आहे.
हेही वाचा-
बांगलादेशच्या यष्टीरक्षकाचा पाकिस्तानात धोनीसारखा पराक्रम, ‘या’ खास यादीत मिळवले स्थान
‘अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द उद्ध्वत करू नका’; योगराज सिंग यांच्यावर संतापले चाहते
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 वेगवान गोलंदाज, एकही भारतीय नाही