आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच रविवारी दशकातील (२०११-२०२०) सर्वोत्तम कसोटी, वनडे व टी-20 संघाची निवड केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या सर्व संघांमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका असून तीन्ही पुरुष संघांचे कर्णधारपद भारतीय खेळाडूंनाच मिळाले आहे.
वनडे व टी20 संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे असून, कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे. वनडे संघामध्ये धोनी व विराट व्यतिरिक्त रोहित शर्माचा देखील समावेश आहे. कसोटी संघांमध्ये विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे व टी-20 संघात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे .
मात्र आयसीसीच्या कोणत्याही संघात एकाही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही हे विशेष. त्यामुळे सध्या पाकिस्तानमधून आयसीसीवर जोरदार टिका होत आहे. अशातच पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक खेळाडू राशिद लतीफ यांनीही आयसीसीच्या टी20 संघावर टीका केली आहे.
आयसीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दशकातील सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर केल्यानंतर राशिद लतिफ यांनी कमेंट लिहिले की , आयसीसी येथे आयपीएल मधील सर्वोत्तम संघ असे लिहायला विसरली आहे.’ राशिद यांच्या या विधानावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.
https://twitter.com/iRashidLatif68/status/1343155115704909830
दरम्यान सोमवारी आयसीसी दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची घोषणा करणार आहे.
असा आहे आयसीसीचा टी20 संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
असा आहे आयसीसीचा वनडे संघ –
रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी(यष्टीरक्षक/कर्णधार) , बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.
असा आहे आयसीसीचा कसोटी संघ –
ऍलिस्टर कूक, डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव स्मिथ, कुमार संगकारा(यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड.
महत्त्वाच्या बातम्या –
तेव्हा कपिल देव आता रविंद्र जडेजा, फक्त या दोन भारतीयांनाच जमलाय ‘हा’ कारनामा
मोठी बातमी! दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर
जडेजाची अर्धशतक पूर्ण करण्याची घाई नडली; रहाणेच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच झाली ‘ही’ नकोशी घटना






