आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champion’s Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान संघ सध्या खूप खराब कामगिरी करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीनं भारताकडून पाकिस्तानला शिकण्याचा सल्ला दिला आहे. अली म्हणाला की, “कसोटी क्रिकेटमध्ये आपला खेळ सुधारण्यासाठी पाकिस्ताननं भारताच्या देशांतर्गत व्यवस्थेची नक्कल करावी.”
बासित अलीनं (Basit Ali) त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “कसोटी मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्राॅफीची एकदिवसीय स्पर्धा होणार आहे. पाकिस्ताननं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या संघांची काॅपी केली आहे. भारत आपल्या अगदी शेजारी आहे. कृपया त्यांची देखील कॉपी करा. कॉपी करण्यासाठी सुद्धा बुद्धी हवी. तुम्ही फक्त भारताची कॉपी करा.”
दुलीप ट्रॉफीच्या आयोजनाबद्दल अलीनं भारताचं कौतुक केलं. त्यांचा पाया मजबूत करण्यात ते व्यस्त आहेत आणि हे त्यांच्या यशाचे एक कारण आहे. असे त्यानं म्हटलं आहे. अली म्हणाला की, “दुलीप ट्रॉफी सुरू झाली पाहिजे. ती टी20 आहे की एकदिवसीय स्पर्धा? ही चार दिवसांची स्पर्धा आहे. आपला पाया मजबूत ठेवण्यावर भारताचा भर आहे आणि म्हणूनच ते इतके यशस्वी आहेत.”
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना (21 ते 25 ऑगस्ट) दरम्यान खेळला गेला. हा सामना रावलपिंडी मैदानावर रंगला होता. या सामन्यात बांगलादेशनं 10 गडी राखून यजमान पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानविरुद्ध कसोटीमध्ये त्यांचा पहिलाच विजय मिळवून बांगलादेशनं ऐतिहासिक कामगिरी केली. दोन्ही संघ (30 ऑगस्ट) रोजी रावलपिंडी मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल मेगा लिलावापूर्वी हेनरिक क्लासेनची स्पर्धेतून माघार; संघाला मोठा धक्का!
“सचिन नंतर मी क्रिकेटचा देव आहे” भारतीय दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य! VIDEO
स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचं ट्विटर अकाऊंट हॅक! रोनाल्डो, मेस्सीवरील वादग्रस्त पोस्ट व्हायरल






