भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. तो भारतीय गोलंदाजी आक्रमणातील मुख्य गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी करण्याची ऍक्शन ही वेगळी आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे असेही म्हणणे आहे की, जसप्रीत बुमराह ज्याप्रकारे गोलंदाजी करतो त्यावरून तो दुखापतग्रस्त होण्याची जास्त शक्यता आहे. अशातच माजी पाकिस्तानी गोलंदाजानेही जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबाबत आपले मत मांडले आहे.
जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ५ वर्षांपेक्षाही अधिक कालावधी उलटला आहे. परंतु २०१९ मध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याची कामगिरी ढासळल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याने त्यावर शस्त्रक्रिया न करता, क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले होते. परंतु, त्याच्या गोलंदाजीमध्ये धार दिसून आली नाही. गोलंदाजी करताना त्याचा इकॉनॉमी रेट देखील वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच तो गडी बाद करण्यात अपयशी ठरत आल्याचे दिसून येत आहे.
अशातच पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने म्हटले की,”बुमराह फ्रंट ऍक्शनने गोलंदाजी करतो. यादरम्यान तो आपली पाठ आणि खांद्याचा जास्त वापर करतो. आम्ही साईड ऑन गोलंदाजी करायचो. त्यामुळे आमची पाठ आणि खांदा जास्त दुखत नव्हता. परंतु जर फ्रंट ऍक्शनने गोलंदाजी करत असताना तुमच्या पाठीला किंवा खांद्याला दुखापत झाली तर, तुम्ही काहीच करू शकत नाही. मी वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि शेन बॉंड यांची अवस्था खराब होत असताना पाहिलं आहे.”(former pakistani cricketer shoaib akhtar says that, if bumrah will play each and every match, he will break down soon )
जास्त सामने खेळवले तर बुमराहची कारकीर्द येईल संपुष्टात
शोएब अख्तर याने पुढे म्हटले की, “त्याला कुठल्याही मालिकेत जर ५ सामने असतील तर फक्त ३ सामन्यात खेळवा. त्याला जर प्रत्येक सामन्यात खेळवल तर त्याची किरकीर्द संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. त्याला ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागेल.”
पीसीबीने माझे कधी ऐकलेच नाही
अख्तरने पुढे म्हटले, “मी देखील पाकिस्तान कक्रिकेट बोर्डला अनेकदा म्हटले होते की, मला जास्त सामने खेळवू नका, परंतु पीसीबीने माझे ऐकले नाही. त्यामुळेच मला अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागला. मी त्यांना म्हटले होते की, वनडे सामने खेळणारा गोलंदाज आहे. यापेक्षा अधिक सामने खेळवणार तर मी दुखापतग्रस्त होऊ शकतो. मी १९९७ मध्ये माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यावेळी माझे गुडघे आंतरराष्ट्रिय क्रिकेटचा दबाव सहन करू शकत नव्हते. जेव्हा ही मी ५ सामने खेळायचो तेव्हा माझ्या घुडघ्यांमध्ये पाणी जमायचे. मी बोर्डला सांगून सांगून थकलो होतो, परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. त्यानंतर मी स्वतःच माझा कार्यभार व्यवस्थित सांभाळला.”
बुमराहने २०२० सालापासून भारताकडून २५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याला तब्बल ४०.६४ च्या सरासरीने ३४ विकेट्स घेण्यात यश आले आहे. तसेच एकदाही त्याने डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पूजा राणीचा पावर पंच! ऑलिंपिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर