भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे. सध्या भारतीय संघ ज्या शिखरावर आहे, तिथपर्यंत पोहोचण्यातही त्याने मोलाचे योगदान दिले आहे. विराटचे विक्रम मोडणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपी गोष्ट नक्कीच नसेल. अशातच आता सोशल मीडियावर विराटवरून चर्चेला उधाण आले आहे. त्याचे चाहते त्याला ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ सांगत आहेत, तर दुसरीकडे त्याची तुलना दाक्षिणात्य सुपरस्टारशी करत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) अनेक हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. यापैकीच एक हॅशटॅग म्हणजे #GOAT होय. विराटचे चाहते त्याचा फोटो वेगवेगळ्या प्रकारे एडिट करून ट्विटरवर शेअर करत आहेत. दुसरीकडे विराटची तुलना दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी (Mahesh Babu) करत आहेत. तसेच जगप्रसिद्ध फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) फोटोही ट्वीट करत आहेत.
एकाने ट्वीट करत लिहिले आहे की, “व्वा! ट्विटरवर विराट कोहलीला ‘गोट’ हॅशटॅग मिळाले. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम.”
Wow , Virat Kohli got a GOAT Symbol hashtag on Twitter🔥
GREATEST OF ALL TIME … #ViratKohli𓃵 pic.twitter.com/SEWcjgZdaH
— Cric-Crazy Lad 🎭 (@Cric_In_Veins) February 23, 2022
दुसऱ्या एकाने लिहिले की, “वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज.” यासोबतच त्याने #ViratKohli असेही लिहिले आहे.
The Greatest batsman in the history of ODI cricket .#ViratKohli𓃵 pic.twitter.com/sB3odL8nvz
— Prashanth.. (@its_King18) February 23, 2022
आणखी एका युजरने महेश बाबू आणि विराटचा कोलाज फोटो शेअर करत लिहिले की, “आपापल्या क्षेत्रातील सर्वोत्तम…#MaheshBabu आणि #ViratKohli.”
G.O.A.T's in their respective fields 🔥#MaheshBabu𓃵 #ViratKohli𓃵https://t.co/6uQBTqAV9r pic.twitter.com/w0EqoT7yqp
— Saikrishna™ (@Saikrishna_SSMB) February 23, 2022
एका युजरने विराट आणि रोनाल्डोचाही फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “शेवटी ट्विटरने गोट वादावर तोडगा काढलाच.”
Finally Twitter Settles The GOAT Debate #CR7𓃵 #ViratKohli𓃵 pic.twitter.com/BKUFwHNomW
— 𝘿 (@DilipVK18) February 23, 2022
विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ९९ कसोटी सामने, २६० वनडे सामने आणि ९७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा, वनडेत ६८.०७ च्या सरासरीने १२३११ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०त ५१.५० च्या सरासरीने ३२९६ धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त त्याच्या शतकांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने कसोटीत २७ शतके आणि वनडेत ४३ शतके ठोकली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘मी प्रत्येक सामना खेळू इच्छितो, पण आमच्याकडे पंत…’, इशानचे रिषभबरोबरील स्पर्धेबाबत मोठे भाष्य
आयपीएल २०२२ मधील तब्बल ७० सामने होणार मुंबई अन् पुण्यात? ‘या’ ४ स्टेडियमवर आयोजनाची शक्यता