आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. या प्रमुख स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ घोषित केला गेला आहे. या संघात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला देखील स्थान दिले गेले आहे. मात्र, याच कारणाने आता एका माजी भारतीय क्रिकेटपटूने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मोरे म्हणाले,
“आशिया चषक संघात रविचंद्रन अश्विनचे नाव पाहून मी हैराण झालो. तुम्ही दरवेळी त्याला कसे संघात घेऊ शकता. मागील विश्वचषकात तो संघात होता मात्र त्याची कामगिरी तितकी चांगली नव्हती. आयपीएलमध्येही त्याच्यापेक्षा सरस कामगिरी केलेले खेळाडू आहेत. मला विचाराल तर, त्याच्या जागी मी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले असते. फिरकी अष्टपैलू म्हणूनही पहिली पसंती अक्षर पटेल याला द्यायला हवी होती.”
आशिया चषक संघात युजवेंद्र चहल व रवी बिश्नोई यांना संधी दिली गेली आहे. तर फिरकी अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा पहिली पसंती असेल.
दरम्यान, आशिया चषकातील पहिला सामना भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळले. आशिया चषकात एकूण ६ संघ सहभागी होणार असून तीन-तीन संघाचे दोन गट बनवले गेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा एक संघ असे एकून तीन संघ एका ग्रुपमध्ये आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधील पहिले दोन संघ उपांत्य सामन्यात खेळतील.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर
मुंबईची वन फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा