पुणे, 25 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू प्रजनेश गुन्नेस्वरण, भारताचा क्र.3 खेळाडू ससीकुमार मुकुंद, सुमित नागल, अर्जुन कढे या चार भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. ही स्पर्धा एम एस एल टीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे 26 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.
एटीपी चॅलेंजरमधील उच्च दर्जाच्या स्पर्धा असलेल्या या स्पर्धेला पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांचे प्रायोजकत्व लाभले असुन रविवारी होणाऱ्या पात्रता फेरीतून अन्य भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश करतील. भारतातील एटीपी चॅलेंजर 100मधील मालिकेतील ही तिसरी स्पर्धा असून याआधीच्या स्पर्धा चेन्नई व बेंगळुरू येथे पार पडल्या. ऑस्ट्रेलियन डेव्हिस कूपर आणि ऑलिम्पिकपटू जेम्स डकवर्थ याने 2019 मध्ये विजेतेपद पटकावले होते आणि बेंगळुरू येथे अंतिम फेरी देखील गाठली होती. जेम्स ला स्पर्धेतील अग्रमानांकन देण्यात आले आहे. 21वर्षीय जागतिक क्रमवारीत 108 व्या स्थानी असलेल्या तैपैईच्या त्सेन चेयुन हसिनला दुसरे, विंबल्डन दुहेरीतील विजेता ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल ला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. 19 वर्षीय इटलीच्या लुका नार्डीला चौथे मानांकन मिळाले आहे.
दुहेरीत 10 भारतीय खेळाडूंचा समावेश असुन मार्क पोलमन्स व मॅक्स रसेल या जोडीला अग्रमानांकन देण्यात आले आहे. अर्जुन कढे व मॅक्सिमिलन न्यूख्रिस्ट यांना दुसरे मानांकन देण्यात आले आहे. दुहेरीत परिक्षित सोमाणी व मनीष ससीकुमार यांना, तर फैजल कुमार व फरदिन कुमार यांना वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आला आहे. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये अनिरुध्द चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत, ऋत्विक चौधरी बोलीपल्ली व निकी कलियांदा यांना मुख्य ड्रॉ मध्ये दुहेरीत प्रवेश देण्यात आला आहे. पात्रता फेरीसाठी संयोजकांच्या वतीने चिराग दुहान, नितीनकुमार सिन्हा, निशित रहाणे, निकी पोनाचा यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे.
उझबेकिस्तानचे आंद्रे कॉर्निलोव्ह हे या स्पर्धेचे एटीपी निरीक्षक असून शितल अय्यर या मुख्य रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विशेष सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. आर्यन पम्प्स, डनलॉप (अधिकृत इक्विपमेंट पार्टनर ), एनर्झल (अधिकृत एनर्जी ड्रिंक पार्टनर), , आणि मणिपाल रुग्णालय (वैद्यकीय साहाय्य) हे स्पर्धेचे अन्य प्रायोजक भागीदार आहेत. स्पर्धेतील सामने दररोज सकाळी 10 वाजता सुरू होणार असून सर्व प्रेक्षकांना विनामूल्य व मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे.
मानांकन यादी खालीलप्रमाणे:
पुरुष एकेरी – 1. जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलीया. 128), 2. त्सेन चेयुन हसिन (तैपेई 131), 3. मॅक्स पर्सेल ( ऑस्ट्रेलीया. 155), 4. लुका नार्डी ( इटली, 158), 5. फ्रान्सिस्को मेस्ट्रेली( इटली, 178), 6. डॅलिबोर स्व्हरसीना (चेक प्रजासत्ताक, 181), 7. यू हसिउ हसू (तैपैई, 206), 8. मार्क पोल्मन्स ( ऑस्ट्रेलीया. 209)
वाईल्ड कार्ड : सुमित नागल, अर्जुन काठे, मुकुंद शशीकुमार
पुरुष दुहेरी – 1) मार्क पोलमन्स /मॅक्स रसेल (ऑस्ट्रे), 2) अर्जुन कढे(भारत)/ मॅक्सिमिलन न्यूख्रिस्ट, 3) पेत्र नौझा – ॲन्ड्रयू पोल्सन (क), 4) तोशिहिदे मात्सुई-कैटो युसुगू (जपान).
वाईल्ड कार्ड : परीक्षित सोमाणी / मनीष सुरेशकुमार ; फैसल कामर / फरदीन कामर
(Four Indians enter main draw at PMR Open ATP Challenger 100 Men’s Tennis Championship)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत
“ती काय जॉगिंग करत होती?” माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर संतापल्या, दिला ‘हा’ धडा