पालघर काझीरंगा रहिनोस विरुद्ध सांगली सिंध सोनिक्स यांच्यात रेलीगेशन फेरीतील लढत झाली. पालघर संघ तीन विजय व 1 सामना बरोबरी सह पहिल्या क्रमांकावर होता. तर सांगली संघ पाचव्या स्थानावर होता. पालघर संघाने आक्रमक सुरुवात करत सांगलीला ऑल आऊट केले.
पालघर काझीरंगा रहिनोस संघाकडे मध्यांतरला 21-15 अशी आघाडी होती. राहुल सवर व राज साळुंखेच्या चतुरस्त्र चढायानी पालघर संघाने आघाडी मिळवली. मात्र सांगलीच्या तुषार खडाखे व वृषभ साळुंखेच्या आक्रमक खेळाने सामना चुरशीचा झाला. अत्यंत चुरशीच्या झालेला सामना मात्र अखेर पालघर संघाने 31-28 असा जिंकला.
पालघर कडून राहुल सवर ने 9 गुण तर राज साळुंखे ने 8 गुण मिळवले. पियुष पाटीलने अष्टपैलू खेळ केला. तर जीत पाटीलच्या 3 पकडी निर्णायक ठरला. सांगली कडून तुषार खडाखे ने 9 तर वृषभ साळुंखे ने 9 गुण मिळवले. वैभव वाघमोडे ने अष्टपैलू खेळ केला. तर साहिल कुचिवले 3 पकडी केल्या. (Fourth win for Palghar Kaziranga Rhinos in relegation round)
बेस्ट रेडर- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर्स- साहिल कुचिवले, सांगली सिंध सोनिक्सहिमालयन ताहर्स
कबड्डी का कमाल- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल निवृत्तीवर धोनीचं स्पष्टीकरण! म्हणाला, ‘मी असं केलं तर…’
रेलीगेशन फेरीत पालघर काझीरंगा रहिनोस, रायगड मराठा मार्वेल्स संघाचा तिसरा विजय