गुरुवारी(13 जून) इंग्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना चेम्सफोर्ड येथे पार पडला. पावसामुळे 39 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडने 135 धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांची वनडे मालिकाही 3-0 अशी सहज जिंकली.
या विजयाबरोबरच या सामन्यात इंग्लंडच्या फ्रॅन विल्सनने वेस्ट इंडिजकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या हॅली मॅथ्यूजचा घेतलेल्या झेलने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 39 षटकात 4 बाद 258 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून एमी एलेन जोन्सने 80 आणि यष्टीरक्षक फलंदाज साराह टेलरने 70 धावांची अर्धशतकी खेळी केल्या. वेस्ट इंडीजकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
त्यांनतर 39 षटकात डकवर्थ लूईस नियमानुसार 267 धावांचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडीजकडून सलामीला मॅथ्यूज आणि ब्रिटनी कुपर उतरल्या. त्यांनी पहिल्या 11 चेंडूत 12 धावा करत चांगली सुरुवात केली होती.
पण इंग्लंडकडून केटी क्रॉसने टाकलेल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅथ्यूजने कव्हर्सच्या दिशेने फटका मारला. त्याचवेळी हवेत उडी मारत फ्रॅन विल्सनने दोन्ही हातांनी सुरेख झेल घेतला. तिच्या या झेलचे संघातील सर्वच खेळाडूंनी कौतुक केले.
How good is this catch by Fran Wilson? 👀 👏 👏 @fwilson07
Watch full highlights here: https://t.co/hEqW7YltAU 🎥 #EngvWI pic.twitter.com/FfqJCG9Gu4
— England Cricket (@englandcricket) June 14, 2019
विल्सनने मॅथ्यूजचा झेल घेतल्यानंतर वेस्ट इंडीजच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. यामध्ये फक्त कशिया नाइटने सर्वाधिक 38 धावांची खेळी करत थोडीफार लढत दिली. तिच्याबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी करत नताशा मॅकलीनने तिला चांगली साथ दिली होती. पण मॅकलीनही 18 धावा करुन बाद झाली.
या दोघींव्यतिरिक्त शेडियन नेशन(15) आणि स्टेसी-ऍन किंग(26) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. त्यामुळे वेस्ट इंडीजच्या महिला संघाचा डाव 37.4 षटकातच 131 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून केटी क्रॉस आणि सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–गांगुली म्हणतो, असे केले तर पाऊस पडल्यानंतर १० मिनीटात सुरु होईल सामना
–विश्वचषक २०१९ नंतरही इतके दिवस रवी शास्त्री असणार टीम इंडियाचे कोच…
–२०११ला रस्त्यावर केले होते सेलिब्रेशन आता लॉर्ड्वर विश्वचषक उंचवण्यास उत्सुक आहे हा खेळाडू