fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत नमिश हूड, रुमा गायकवारी ठरले महागडे खेळाडू

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसीठी झालेल्या लिलावात नमिश हूड, रुमा गायकवारी हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर 16 जूनपासून सुरू होणार आहे.

या लीगमध्ये 6 संघांमध्ये 8,10, 12 व 14 वयोगटाखालील एकुण 133 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.

8 वर्षाखालील गटात नमिश हूडने 4000 गुण मिळवत सर्वात महागड्या खेळाडूचा मान मिळवला असून त्याला विपार स्पिडिंग चिताज संघाने विकत घेतले आहे. त्यापाठोपाठ रुमा गायकवारी(3,900गुण, कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स), पार्थ देवरुखकर (3,500गुण, फ्लाईंग हॉक्स), रित्सा कोंडकर(3,500गुण, इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स), समृद्धी भोसले(3,300गुण, पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स) हे खेळाडूही लिलावमध्ये सर्वाधीक महाग विकले गेले.

याआधीच्या ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेमुळे शहरांतील कुमार टेनिसपटुंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊन हे खेळाडू राज्यभरातच नव्हे तर देशातही आपल्या क्रमवारीत आघाडीवर आहेत. यामध्ये सालसा अहेर, ऋतुजा चाफळकर, गार्गी पवार, वैष्णवी आडकर, मानस धामणे यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंना या लीग स्पर्धेचा फायदा झाला असून या माध्यमातून त्यांना आपले खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली, असे पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयुक्त कौस्तुभ शहा व पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, स्पर्धेमध्ये विविध टेनिस अकादमी व क्लब मधुन खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. लिलावासाठी एकूण 203 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामधून 6 संघांसाठी 133 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

लीगमध्ये 6 संघांसाठी 6 प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये विपार स्पीडिंग चिताज् – आश्विन गिरमे, कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स्-विक्रम देशमुख, मेट्रोसिटी रेजिंग्ज् बुल्स- शिवाजी चौधरी, पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स- नवनाथ शेटे, इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायझिंग इगल्स्- अतुल देवधरे आणि फ्लाईंग हॉक्स- रोहित नाटेकर व निशित शहा, यांचा सहभाग आहे.

कौस्तुभ शहा पुढे म्हणाले की, स्पर्धेत 8 वर्षाखालील मिश्र गटाचा एकेरी सामना, 10 वर्षाखालील मुले व 10 वर्षाखालील मुली एकेरी, 12 वर्षाखालील मुले व 12 वर्षाखालील मुली एकेरी, 14 वर्षाखालील मुले व 14 वर्षाखालील मुली एकेरी, 10 वर्षाखालील मुले दुहेरी, कुमार दुहेरी गट(14 वर्षाखालील मुले), 14 वर्षाखालील मुले दुहेरी, मिश्र दुहेरी गट(14 वर्षाखालील मुली व 12 वर्षाखालील मुले) अशा एकूण 11 लढती होणार आहेत. सर्व सामने बेस्ट ऑफ 11 गेम(6 गेम मध्ये विजय) टायब्रेक 5 ऑल असे असणार आहेत. टायब्रेक विजेता संघ हा ज्या संघाने जास्तीत जास्त गेम जिंकल्या आहेत तो संघ विजेता ठरणार आहे.

पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, या स्पर्धेमुळे कुमार खेळाडूंमधील गुणवत्ता सिद्ध होणार असून लहान वयात व्यावसायिक दृष्ट्या विचार करण्यासाठी मदत होणार आहे. यांसारख्या लीग स्पर्धांमुळे खेळाडूंना आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळेल आणि पुण्यातील टेनिस खेळात कौटुंबिक भावना निर्माण होण्यासाठी मदत होईल.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 40,000/-,रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 25,000/- अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे

कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स:

श्रावी देवरे, वीरा हरपुडे, नील केळकर, स्वर्णीम येवलेकर, समीहन देशमुख, आर्यन कीर्तने, मृणाल शेळके, काव्या देशमुख, रिआन मुजगुळे, शिवम पाडिया, अथर्व जोशी, आरुष मिश्रा, रितिका मोरे, ख़ुशी पाटील, अर्जुन अभ्यंकर, अनमोल नागपुरे, ऋषिकेश बर्वे, प्रणव इंगोळे, रुमा गायकवारी, कनिका बाबर, डेलिशा रामघट्टा, वेदांत ससाणे;

पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स:

अचिंत्य कुमार, शौर्य गदादे, मनन अगरवाल, दक्ष पाटील, राम मगदूम, सय्यम पाटील, प्रज्ञेश शेळके, आस्मि आडकर, अभिराम निलाखे, अर्णव बनसोडे, अमन शहा, वैष्णवी सिंग, अभिनित शर्मा, अनन्या देशमुख, आदित्य राय, सार्थ बनसोडे, आदित्य भटवेरा, मोक्ष सुगंधी, अमोद सबनीस, सिमरन छेत्री, ईशान्य हटनकर, समृद्धी भोसले;

इन्टेंसिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स:

रित्सा कोंडकर, स्मित उंडरे, वरद उंडरे, शिवतेज श्रीफुले, आरोही देशमुख, प्रेक्षा प्रांजल, शौर्य घोडके, अहान सारस्वत, पृथ्वीराज हिरेमठ, अर्जुन खलाटे, हिमनेश बांगीया, पार्थ काळे, देवांशी प्रभुदेसाई, सहाना कमलाकन्नन, आर्यन हूड, अनिश रांजलकर, अनन्मय उपाध्याय, दिव्यांक कवितके, सिद्धी खोत, राजलक्ष्मी देसाई, सानिका लुकतुके, क्रिशय तावडे;

फ्लाईंग हॉक्स:

अंशुल पुंजारी, सृष्टी सूर्यवंशी, सक्षम भन्साळी, देव घुवालेवाला, निव गोजिया, केया तेलंग, रोहन बजाज, जसलीन कटरिया, अर्जुन कीर्तने, अवनीश गवळी, तेज ओक, साईराज क्षोत्री, श्रावणी देशमुख, चिराग चौधरी, सुधांशु सावंत, पार्थ देवरुखकर, श्लोक गांधी, तनिश बेलगलकर, कौशिकी समंथा, एंजल भाटिया, माही ग्यान, अंजली निंबाळकर;

मेट्रोसिटी रेजिंग बुल्स:

नील देसाई, स्वराज भोसले, शार्दूल खवळे, वरद पोळ, वीरेन चौधरी, अथर्व येलभर, प्रिशा शिंदे, स्वनिका रॉय, जश शहा, अद्विक नाटेकर, अभय नागराजन, आदित्य ठोंबरे, दुर्गा बिराजदार, निशिता देसाई, अर्णव कोकणे, जय पवार, मानस गुप्ता, देवेन चौधरी, शौर्य राडे, संचिता नगरकर, याशिका बक्षी, अवंती राळे, आरुष देशपांडे;

विपार स्पिडिंग चिताज:

नमिश हूड, स्वराज जावळे, क्रिशांक जोशी, वेद मोघे, नीरज जोर्वेकर, रियान माळी, ध्रुवी अद्यांता, ह्रितिका कापले, अर्चित धूत, वेदांग काळे, विश्वजित सणस, राज दर्डा, सलोनी परिदा, अनुष्का , ईशान देगमवार, अदनान लोखंडवाला, ऐतरेत्या राव, केयूर म्हेत्रे, कृष्णा घुवालेवाला, अलिना शेख, नाव्या भामिदिप्ती, श्रावणी पत्की.

You might also like