मुंबई। श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ-भायखळा यांच्या विद्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील मुले व मुलींकरिता विनाशुल्क कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे दि. २२ ते २९ मे २०२२ या कालावधीत सायं. ५-०० ते ८-०० या वेळेत हे शिबिर घेण्यात येईल. या शिबिरात १० ते २२ या वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येईल. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय खेळाडू मेघाली कोरगावकर-म्हसकर, मुंबई पोलीस संघाचे प्रशिक्षक एकनाथ सणस, राष्ट्रीय प्रशिक्षक सुहास जोशी, राष्ट्रीय खेळाडू अपर्णा शेट्टे यांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभणार आहे. तर बेंगळुरू बुल्सचे फिटनेस ट्रेनर रोहित यादव हे शिबिरार्थींना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देणार आहेत.
कबड्डी खेळातील कौश्यल्य(स्कील्ड), लवचिकता(स्ट्रेंथ), गती(स्पीड) वाढविण्याकरिता ऍडव्हान्स प्रशिक्षण, आहार(डाएट) आणि वेळेचे नियोजन(प्रोग्रामिंग) याचे मार्गदर्शन, शिवाय नामांकित राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन हे या शिबिराचे वैशिष्ट ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कबड्डी खेळाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान मंजूर
मुंबई शहरचा कुमार-कुमारी गटाचा संघ जाहीर
४८वी कुमार-कुमारी राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी या दिवसापासून पुण्यात होणार