नवी दिल्ली। ऑस्ट्रेलिया संघ कठीण परिस्थितीत असताना कसोटी कर्णधार टीम पेनने संघाची जबाबदारी सांभाळली होती. पेनने कर्णधारपदाचा कधी विचारही केला नव्हता. परंतु जेव्हा त्याला ही संधी मिळाली, तेव्हा त्याने ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. पेनच्या आयुष्यात असा एका काळ आला होता, जेव्हा तो गंभीर दुखापतीमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता. तो क्रिकेटचा तिरस्कार करू लागला होता तसेच रडत होता. त्याने म्हटले, की त्याने क्रीडा मानसशास्त्रज्ञाच्या मदतीने यापासून सुटका केली होती.
चॅरिटी सामन्यात पेनला झाली होती गंभीर दुखापत
दक्षिण आफ्रिकेमध्ये चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्टिव्ह स्मिथच्या जागी कसोटी कर्णधार म्हणून निवडलेल्या पेनला २०१० मध्ये ही दुखापत एका चॅरिटी सामन्यात झाली होती. डर्क नानेसच्या चेंडूवर त्याच्या डाव्या हाताचे बोट तुटले होते. दुखापतीतून सावरण्यासाठी पेनला तब्बल ७ वेळा सर्जरी करावी लागली होती. त्यामध्ये ८ पिन, मेटल प्लेट आणि एका प्राण्याच्या हाडाच्या तुकड्याचा आधार घ्यावा लागला होता. त्यामुळे तो तब्बल २ सत्र क्रिकेटपासून दूर राहिला होता.
पेनला वाटत होती भीती
पेनने (Tim Paine) ‘बाऊन्स बॅक पॉडकास्ट’ मध्ये म्हटले, “जेव्ही मी पुन्हा खेळायला आणि प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मी फार खराब खेळत नव्हतो. जेव्हा मी वेगवान गोलंदाजांचा सामना करू लागलो, तेव्हा माझे लक्ष हे चेंडू मारण्यापेक्षा बोट वाचविण्यावर असायचे. जेव्हा गोलंदाज धावायला सुरुवात करायचा, तेव्हा मी प्रार्थना करायचो, की जीजस ख्राईस्ट मला अपेक्षा आहे की तो माझ्या बोटावर चेंडू मारणार नाही.”
“येथूनच मी खेळात चांगली कामगिरी करण्यात मागे पडू लागलो होतो. मी नक्कीच आत्मविश्वास गमावला होता. मी याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. खरं म्हणजे मी दुखापतग्रस्त होण्यापासून भीत होतो आणि मला माहीत नव्हते की मी काय करत आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
एकटा बसून रडायचा पेन
३५ वर्षीय पेनने म्हटले, की या संघर्षाने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रभाव पडला होता. तो म्हणाला, “मला झोप येत नव्हती, मला व्यवस्थित जेवणही जात नव्हते. माझ्यामध्ये काही शक्तीच नसल्यासारखे मी खेळापूर्वी भीत होतो. याबरोबर जगणे भयानक होते. मी नेहमी रागामध्ये असायचो आणि तो राग मी इतरांवर काढत होतो.”
“कोणालाही माझ्या संघर्षाबाबत माहीत नव्हते. माझ्या पार्टनरलाही माहीत नव्हते, ती आता माझी पत्नी आहे. एक असाही काळ होता, जेव्हा ती माझ्यासोबत नसायची, तेव्हा मी काऊचवर बसून रडत असायचो. हे विचित्र आणि दु:खद होते,” असेही तो पुढे म्हणाला.
मानसशास्त्रज्ञाकडून घेतली मदत
यानंतर त्याने क्रिकेट तस्मानियामध्ये एका क्रीडा मानसशास्त्रज्ञाशी संपर्क साधला, ज्याचा सकारात्मक परिणाम पडला. तो म्हणाला, “पहिल्यांदा मी त्यांच्याशी केवळ २० मिनिटे बसलो आणि मला आठवते की त्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर मला स्वस्थ वाटत होते.”
“यातून बाहेर पडण्याचे पहिले पाऊल हेच होते की मला जाणीव झाली की मला मदतीची गरज आहे. तब्बल ६ महिन्यांनंतर मी पूर्णपणे ठीक झालो होतो,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पत्नीच्या टॉयलेट प्रकरणामुळे या खेळाडूने केले होते लाजिरवाणे कृत्य, एका वर्षासाठी घातली होती बंदी
-जेव्हा दीपिका पादुकोणला पाहुन लाजले होते धोनी- युवी…
-हसीन जहाँने शेअर केलेल्या वर्कआऊट व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या शिव्या