भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शनिवारी (14 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात भाारताने नाणेफेक जिंकूण पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 42.5 षटकांत 191 धावांवर सर्वबाद झाला. हे लक्ष भारतीय संघाने अवघ्या 30.3 षटकात 3 विकेट्स गमावून पार केले, भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावा केल्या.
या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सामनावीर ठरला. तगड्या गोलंदाजीसोबतच त्याने विकेट्सही घेतल्या. त्याने 7 षटकात केवळ 19 धावा देत 2 बळी घेतले. या दमदार कामगिरीमुळे बुमराह त्या विशेष यादीत सामील झाला आहे, ज्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा समावेश आहे. तो पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात सामनावीर ठरणाऱ्या भारतीयांच्या यादित सामिल झाला आहे.
या विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सात वेळा सामना झाला होता. भारताने हे सर्व सामने जिंकले आहेत. सचिन तेंडुलकर 3 वेळा भारताच्या विजयाचा हिरो ठरला आहे. भारत पाकिस्वातान सामन्यात सामनावीर ठरलेल्या खेळाडूंची खास यादी…
विश्वचषक 1992- सचिन तेंडुलकर
विश्वचषक 1992मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. सचिन तेंडुलकरने या सामन्यात 62 चेंडूत 54 धावांची महत्वपूर्ण खेळी करत 1 विकेट्सही घेतली होती. त्याने भारताला 43 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विश्वचषक 1996- नवज्योत सिंग सिद्धू
या विश्वचषक सामन्यात नवज्योत सिंग सिद्धू सामनावीर ठरले होते. त्यांनी 115 चेंडूत 93 धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताला हा सामना 39 धावांनी जिंकून दिला होता.
विश्वचषक 1999- व्यंकटेश प्रसाद
व्यंकटेश प्रसादने या सामन्यात 27 धावांत 5 बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. प्रसादच्या या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताचा 47 धावांनी विजय झाला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
विश्वचषक 2003- सचिन तेंडुलकर
या विश्वचषकात सचिन तेंडुलकर सामनावीर ठरला होता. सचिनने 75 चेंडूत 98 धावांची धमाकेदार खेळी करत भारताला 6 विकेटने विजय मिळवून दिला होता.
विश्वचषक 2011- सचिन तेंडुलकर
या विश्वचषकातही सचिन तेंडुलकर विजयाचा हिरो ठरला होता. त्याने 85 धावा करत भारताने 29 धावांनी मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विश्वचषक 2015- विराट कोहली
या विश्वचषकात विराट कोहलीने 126 चेंडूत 107 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने 76 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
विश्वचषक 2019- रोहित शर्मा
या विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) विजयाचा हिरो ठरला होता. त्याने 113 चेंडूत जबरदस्त फलंदाजी करत 140 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 89 धावांनी जिंकला होता. (From Sachin to Bumrah see who became the hero against Pakistan in the World Cup)
हेही वाचा-
CWC23 Toss: दिल्लीत इंग्लंडने जिंकला टॉस, बटलरसेना करणार फिल्डिंग; अफगाणी ताफ्यात मोठा बदल
‘मास्टर ब्लास्टर’ने उडवली शोएब अख्तरची खिल्ली; ट्वीट करत जे काही म्हणाला, त्याची सर्वत्र रंगलीय चर्चा, वाचाच