---Advertisement---

हरभजनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटविश्वातून प्रतिक्रियांचा पूर, ‘भज्जी’शी वाकडं असलेल्या श्रीसंतनेही दिल्या शुभेच्छा

Comments-On-Harbhajan's-Retirement
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वकालिन महान फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने शुक्रवार रोजी (२४ डिसेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (Harbhajan Singh Retirement) जाहीर केली आहे. त्याने २०१६ मध्ये भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु तो टी२० लीग, आयपीएलमध्ये खेळताना दिसत होता. मात्र आता त्याने क्रिकेटच्या सर्वच स्वरुपांना रामराम ठोकला आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटद्वारे त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. यानंतर क्रिकेटविश्वातील बऱ्याचशा खेळाडूंनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (Veterans Comments On Harbhajan’s Retirement)

हरभजनने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो. मला त्या खेळाला आता अलविदा करण्याची वेळ आली आहे, ज्या खेळाने मला सर्वकाही दिले. मला त्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे, ज्यांनी या २३ वर्षाच्या शानदार प्रवासात मला साथ दिली.’

https://twitter.com/harbhajan_singh/status/1474302128311062533?s=20

क्रिकेटपटूंच्या आलेल्या प्रतिक्रिया:

हरभजनच्या निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हरभजनसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘१९९५ मध्ये एका सराव सत्रात मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो. आता तू माझ्या सुंदर अशा आठवणींचा भाग बनला आहेस. तू तुझ्या कारकिर्दीदरम्यान खूप चांगला खेळलास.’

https://twitter.com/sachin_rt/status/1474336582018560001?s=20

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे विद्यमान प्रमुख आणि माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले की, ‘अविस्मरणीय कारकिर्दीसाठी अभिनंदन. दमदार ऑफ स्पिनर, उमदा फलंदाज आणि प्रतिस्पर्धी क्रिकेटपटू, जो भारताच्या अनेक शानदार विजयांचा सूत्रधार राहिला. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा भज्जी.’

https://twitter.com/VVSLaxman281/status/1474308109766049794?s=20

अगदी आयपीएल २००८ मध्ये हरभजनने ज्याला चापट मारली होती. आणि त्यानंतर तो मैदानातच रडत बसलेला, अशा एस श्रीसंत (S Sreesanth) नेही त्याच्या निवतृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तू भारताचाच नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तुला जाणून घेणे आणि तुझ्यासोबत खेळणे ही अभिमानाची गोष्ट आहे,’ असे त्याने लिहिले आहे.

https://twitter.com/sreesanth36/status/1474313041818927106?s=20

यांच्यासह बऱ्याचशा क्रिकेटपटूंनी हरभजनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/navdeepsaini96/status/1474313075339661313?s=20

https://twitter.com/bhogleharsha/status/1474312963532095488?s=20

https://twitter.com/parthiv9/status/1474316756084613120?s=20

https://twitter.com/rpsingh/status/1474318590484496386?s=20

https://twitter.com/SDhawan25/status/1474318809985011713?s=20

https://twitter.com/imkuldeep18/status/1474318556154056705?s=20

https://twitter.com/y_umesh/status/1474321007863164928?s=20

https://twitter.com/ImRaina/status/1474328559267110912?s=20

अशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हरभजन सिंग याने आपल्या २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १०३ कसोटी सामने खेळताना ४१७ बळी मिळवले. तर २३६ वनडे सामन्या त्याच्या नावे २६९ बळी जमा आहेत. याव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये त्याने २८ सामने खेळताना २५ बळी मिळवले होते. तो आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करणारा केवळ चौथा गोलंदाज होता. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. हरभजन २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. अनिल कुंबळे यांच्यानंतर त्याने अनेक वर्ष भारतीय क्रिकेटच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळली.

महत्त्वाच्या बातम्या-

रहस्य उलगडले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत भारताचे ‘हे’ २ धुरंधर करणार ओपनिंग?

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

जुनी आठवण! १८ वर्षांच्या ‘यंग भज्जी’ला गोलंदाजी करताना पाहिलंय का? पाहा हा व्हिडिओ

हेही पाहा- 

आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत | Batsman without Ducks in ODI Cricket

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---