---Advertisement---

आयपीएल २०२१ला मिळाले टॉप-४ संघ, ‘असे’ होतील प्लेऑफ आणि फायनलचे सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवार रोजी (०८ ऑक्टोबर) या हंगामातील शेवटचे २ साखळी फेरी सामना पार पाडले आणि यासह यंदाच्या हंगामातील टॉप-४ संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. हे संघ आता आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी प्लेऑफचे सामने खेळतील. तत्पूर्वी या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक कसे असेल, ते पाहूया.

असे होतील प्लेऑफचे सामने
साखळी फेरी सामन्यांनंतर आता १० ऑक्टोबरला गुणतालिकेतील पहिल्या २ स्थानांवरील संघांमध्ये अर्थातच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पहिला क्वालिफायर सामना पार पडेल. दुबईच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तर, पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी आणखी संधी मिळेल.

तर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघांमध्ये म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात ११ ऑक्टोबरला शारजाह येथे एलिमिनेटरचा सामना पार पडेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघाविरुद्ध १३ ऑक्टोबरला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळेल. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. अंतिम सामना १५ ऑक्टोबरला दुबई येथे होणार आहे.

प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक
१० ऑक्टोबर, पहिला क्वालिफायर– दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दुबई (संध्याकाळी ७.३०)
११ ऑक्टोबर, एलिमिनेटर– रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शारजाह (संध्याकाळी ७.३०)
१३ ऑक्टोबर, दुसरा क्वालिफायर– क्वालिफायर १ हारणारा संघ विरुद्ध एलिमिनेटर जिंकणारा संघ, शारजाह (संध्याकाळी ७.३०)
१५ ऑक्टोबर, अंतिम सामना– क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता, दुबई (संध्याकाळी ७.३०)

महत्त्वाच्या बातम्या-

टेबल टॉपर्सलाही चोपलं! दिल्लीविरुद्ध मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक, मोठ्या विक्रमांची खात्यात भर

आशेला बुच, स्वप्नांचा चुराडा! हैदराबादच्या सलामवीरांच्या झंझावातामुळे मुंबई प्ले ऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’

ईशान-रोहितच्या वादळात हैदराबाद भुईसपाट; सलीमी जोडीने नवा विक्रम केला प्रस्थापित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---