---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने

On: गुरूवार, डिसेंबर 3, 2020 1:49 PM
---Advertisement---

कॅनबेरा। भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरु आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका नुकतीच बुधवारी संपली. या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ असा विजय मिळवला. आता सर्वांना वेध लागले आहेत ते ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात होणाऱ्या टी२० मालिकेचे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ डिसेंबरपासून ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा टी२० सामना ६ डिसेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सिडनी येथे जाईल. ८ डिसेंबरला टी२० मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. हा सामना सिडनीमध्येच होणार आहे. सर्व ३ टी२० सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरुवात होणार आहे.

त्याचबरोबर या टी२० मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघाचा सिडनी येथेच ३ दिवसीय सराव सामना सुरु होणार आहे. हा सामना ६ ते ८ डिसेंबर दरम्यान होईल. तसेच या ३ दिवसीय सराव सामन्याला रोज पहाटे ५ वाजता सुरुवात होईल.

हा सराव सामना सिडनीमध्ये जरी होणार असला तरी हा सामना ड्रममोने ओव्हल या मैदानात होईल. तर ६ आणि ८ डिसेंबरला होणारे भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानचे टी२० सामने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होतील. या ३ दिवसीय सराव सामन्यात भारतीय कसोटी संघातील खेळाडू खेळणार आहेत.

असे आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील टी२० मालिकेचे पूर्ण वेळापत्रक –

पहिला टी२०– ४ डिसेंबर कॅनबेरा, दुपारी १.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा टी२० – ६ डिसेंबर, सिडनी, दुपारी १.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा टी२० – ८ डिसेंबर, सिडनी, दुपारी १.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

सराव सामना – ४ ते ६ डिसेंबर, सिडनी, पहाटे ५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर चहलची ‘सिग्नेचर पोझ’ रवींद्र जडेजालाही करावीच लागली, पाहा व्हिडिओ

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा

ट्रेंडिंग लेख  –

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्‍या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०त एका सामन्यात चौकार, षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा कुटणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---