भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर मैदानावर विजयासाठी नेहमीच आतुरलेला असायचा. त्याचबरोबर तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो. कित्येक वेळा तर गंभीरला मैदानावरच इतर संघाच्या खेळाडूंशी भिडला आहे.
आता गंभीर क्रिकेटसोडून राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत गंभीर पूर्व दिल्लीतून निवडून आला होता. तो आता क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही देशासाठी कष्ट घेताना दिसत आहे.
सध्या जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत गंभीरने मोठी मदत केली. यावेळी गंभीरला ज्या संघाचा राग यायचा आता त्याच संघाने त्याच्या मदतीमुळे त्याची प्रशंसा केली आहे.
गंभीरने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपला पुढील २ वर्षांचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हे दान केलेले पाहून आयपीएल फ्रंचायझी संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले आणि एक पत्रही लिहिले आहे. आरसीबीच्या या प्रशंसेमुळे (Apprecition) गंभीर भलताच खूश झाला आहे.
Former India batsman Gambhir donates two years' salary as an MP to fight coronavirus! Read more now. 👇https://t.co/6P0eQNEhPs
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 3, 2020
गंभीरने आरसीबीला उत्तर देत लिहिले की, “मला तुमच्या संघाविरुद्ध पराभूत व्हायला आवडत नव्हते. तरीही आज या कौतुकामुळे तुम्ही माझे मन जिंकले आहे. खूप खूप धन्यवाद.”
@RCBTweets I hated losing to you guys, but today you have won me over by this acknowledgment. Thanks a lot.
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) April 3, 2020
यापूर्वी गंभीरने आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपयांची मदतही दिली आहे. गंभीरव्यतिरिक्त विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, मिताली राज आणि इतर क्रिकेटपटूंनी या व्हायरसच्याविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात दिला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एवढा मोठा गुन्हा केलाच आहे तर त्या क्रिकेटपटूंना थेट फाशी द्या
-लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज??? मंधानाने दिले हे उत्तर
-लाईफ पार्टनर होण्यासाठी स्मृती मंधानाने ठेवल्या या दोन अटी