टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा लवकरच होणार आहे. बीसीसीआयनं याबाबतची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून, माजी सलामीवीर गौतम गंभीर हा या पदासाठी प्रबळ दावेदार आहे. आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू जॉन्टी रोड्स यांना टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनवलं जाऊ शकतं. याबाबत गौतम गंभीरनं रोड्स यांच्याशी चर्चा केली आहे.
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, गौतम गंभीरनं सपोर्ट स्टाफमध्ये सामील होण्याबाबत जॉन्टी रोड्स यांच्याशी चर्चा केली आहे. गंभीरनं रोड्स यांना त्यांची इच्छा विचारली. जर गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तर जॉन्टी रोड्स यांचं क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून स्थानही जवळपास निश्चित आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या दोघांनी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी एकत्र काम केलं असून, त्यांच्यामध्ये खूप चांगला समन्वय आहे.
जॉन्टी रोड्स हे दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू आहेत. त्याला कोचिंगचाही भरपूर अनुभव आहे. रोड्स यांनी अनेक आयपीएल संघांसोबत काम केलंय. लखनऊ संघासोबत काम करण्यापूर्वी ते मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जसोबत देखील होते. अशाप्रकारे रोड्स यांचा प्रदीर्घ अनुभव टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
अनेक रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर हा टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. तो या शर्यतीत बाकी उमेदवारांपेक्षा खूप पुढे आहे. गंभीर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. त्यापूर्वी गंभीर लखनऊच्या संघासोबत होता. तेथेही त्याच्या मार्गदर्शनाखाली लखनऊनं दमदार कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमधून होते करोडोंची कमाई, गाैतम गंभीरची एकूण संपत्ती जाणून व्हाल थक्क!
मुख्य प्रशिक्षक पदासाठी पहिल्याच मुलाखतीत गंभीरनं बीसीसीआयसमोर ठेवल्या 5 अटी
विराट-रोहितने भेट घेतलेले ‘ते’ महान क्रिकेटर नक्की आहे तरी कोण?