---Advertisement---

कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, गीतेचा श्लोक ट्वीट करत म्हणाला…

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. केकेआरच्या या विजयात महत्त्वाची कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरचे खूप कौतुक होत आहे. संघाच्या विजयानंतर त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. गंभीरने गीतेतील एक श्लोक लिहिला आहे. गंभीरनं ट्वीटमध्ये लिहिलं की, “ज्यांचा विचार आणि कृती सत्यावर आधारित आहेत, त्यांचा रथ अजूनही श्रीकृष्ण चालवत आहेत.”

 

आयपीएलच्या या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी शानदार खेळ केला आणि फायनलपर्यंत मजल मारली. या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात कहर केला. त्यानं हैदराबादचा सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केलं आणि त्यानंतर राहुल त्रिपाठीचीही विकेट घेतली. हैदराबाद 18.3 षटकांत 113 धावांवर ऑलआऊट झाला. केकेआर समोर विजयासाठी 114 धावांचं लक्ष्य होतं.

धावांचा पाठलाग करताना सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज गुरबाजनं 39 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डावखुऱ्या व्यंकटेश अय्यरनं आक्रमक फलंदाजी करत 10.3 षटकांत सामना जिंकवला. व्यंकटेशनं 26 चेंडूत 52 धावांची खेळी खेळली. मिचेल स्ट्रार्कला त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ‘सामनावीर पुरस्कार’ देण्यात आला.

आयपीएलच्या इतिहासात श्रेयस अय्यर आयपीएल ट्राॅफी जिंकणारा चाैथा भारतीय कर्णधार बनला आहे. महेंद्र सिंह धोनी, गाैतम गंभीर, रोहित शर्मा नंतर आता श्रेयस अय्यरची वर्णी लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खान सैराट! गंभीरचा मुका घेतला, स्टार्कवर प्रेमाचा वर्षाव; पाहा VIDEO

नितीश रेड्डी उदयोन्मुख खेळाडू तर मॅकगर्क सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर; जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला

सुनील नारायणची जादू अन् गौतम गंभीरचा गुरुमंत्र! ‘या’ 5 कारणांमुळे केकेआर 10 वर्षांनंतर बनली चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---