टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कारभार संपुष्टात आला होता. दरम्यान टीम इंडियाच्या नव्या हेड कोच साठी गाैतम गंभीरची सर्वत्र जोरदार चर्चा होती. मात्र आज (9 जुलै) बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यावर शिक्कमोर्तब केला आहे. जय शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
वास्तविक, जय शहा यांनी गाैतम गंभीर सोबत फोटो शेअर करत ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हणाले, ‘मला खूप आनंद होत आहे की मी गौतम गंभीरचे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करत आहे. आधुनिक काळात क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी करून त्यात बदल जवळून पाहिले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गौतम हा आदर्श व्यक्ती आहे. या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी बीसीसीआयने त्याला पाठिंबा दिला आहे.
तर या पोस्टला प्रतिक्रिया देत गाैतम गंभीर म्हणाला, भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. वेगळी टोपी परिधान करूनही मला परत येण्याचा सन्मान वाटतो. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच राहिले आहे. 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने निळ्या रंगातील पुरुषांच्या खांद्यावर आहेत आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करीन!
India is my identity and serving my country has been the greatest privilege of my life. I’m honoured to be back, albeit wearing a different hat. But my goal is the same as it has always been, to make every Indian proud. The men in blue shoulder the dreams of 1.4 billion Indians… pic.twitter.com/N5YyyrhXAI
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची पहिली मालिका 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणार आहे. या महिन्याच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. गंभीरचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल आणि या कालावधीत अनेक आयसीसी स्पर्धाही होणार आहेत. गंभीरसमोर पहिले आव्हान पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असेल, त्यानंतर भारताला 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मोठ्या आशा आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटमध्ये ‘गंभीर’ युगाला सुरुवात, चॅम्पियन खेळाडू बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच!
सिराजचं नशीब चमकलं, भेटी दरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी केली खास घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ, अनेक खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता, खास गोलंदाजाचं पुनरागमन निश्चित!