---Advertisement---

सिराजचं नशीब चमकलं, भेटी दरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी केली खास घोषणा

---Advertisement---

टीम इंडिया आयसीसी टी20 विश्वचषक जिंकण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूचे मोलाचे योगदान आहे. ज्यमध्ये मोहम्मद सिराज देखील टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 च्या टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे दिल्ली आणि मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर चॅम्पियन खेळाडू आपपल्या घरी परतले. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच सिराजची भेट घेतली. त्यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि राहण्यासाठी जागा देण्याची घोषणा केली आहे.

वास्तविक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराजची भेट घेऊन त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यासोबतच सिराजला सरकारी नोकरीचीही घोषणा करण्यात आली. हैदराबादमध्ये घर बांधण्यासाठी सिराजला जमीन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यावेळी सिराजनी मुख्यमंत्र्यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली. सिराज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या बैठकीची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा आहे. टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलच्या पहिल्या होम मॅचमध्ये सिराजने घातक गोलंदाजी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. सिराजच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तो चमकदार होता. सिराजने भारतासाठी 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 68 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 27 कसोटी सामन्यात 74 बळी घेतले आहेत. सिराजने भारतासाठी 13 टी-20 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.

महत्तवाच्या बातम्या- 

“मी खूप भाग्यवान…”, रोहित शर्माची गुरु राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ, अनेक खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता, खास गोलंदाजाचं पुनरागमन निश्चित!
राहुल द्रविडला या आयपीएल संघाकडून मोठी ऑफर, ‘द वाॅल’ दिसणार नव्या भूमिकेत?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---