भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. दोन्ही सामन्यात भारताने वर्चस्व गाजवत मालिका आपल्या नावावर केली. पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात भारताने 280 धावांनी बांगलादेशचा दारूण पराभव केला. दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला गेला. दरम्यान भारताने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी एकमेकांना मिठी मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारताने 2024चा टी20 विश्वचचषक जिंकल्यानंतर माजी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर माजी भारतीय दिग्गज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारताची सूत्रे हाती घेतली आहेत. गंभीरच्या मार्गदर्शनाखालील पहिल्याच कसोटीत भारताने बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत दणदणीत विजय मिळवला.
भारताच्या शानदार विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूप आनंदी होते. जेव्हा भारतीय संघ आपला विजय साजरा करत होता, तेव्हा गंभीर स्टायलिश लूकमध्ये दिसला, त्याने कोहलीला मिठी मारली. दोघांमधील हा क्षण सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. गंभीरने कोहलीच्या पाठीवर थापही मारली.
चौथ्या डावात भारतासमोर 95 धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 गडी लवकर गमावले. अशा स्थितीत विराट कोहलीने (Virat Kohli) एका बाजूकडून कमान सांभाळत 29 धावांची महत्त्वाची खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
MOMENT OF THE DAY…!!! ❤️
– Gautam Gambhir hugging Virat Kohli. pic.twitter.com/YroNQaSrPz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 1, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; ‘या’ 3 स्टार खेळाडूंचे भारताच्या टी20 संघात होणार पदार्पण?
IND vs BAN; विजयानंतर बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला कोहलीने गिफ्ट केली बॅट
“राहुल द्रविड आणि गौतम गंभीर…” बांगलादेशला पछाडल्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य!