---Advertisement---

बर्थडे बाॅय गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना झाप- झाप झापले

---Advertisement---

क्रिकेटपटू गौतम गंभीर त्याच्या सडेतोड बोलण्याने नेहमी चर्चेत असतो. गौतम गंभीर आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात काल (12 आॅक्टोबर) सोशियल मिडियावर चांगलाच खटका उडाला.

जम्मु कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे जवानांसोबत झालेल्या चकमकीत मनन वानी मारला गेला होता.

“आपण एका कट्टरतावाद्याला मारले आहे. त्यावर ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, काॅंग्रेस आणि भाजपाने माना खाली घातल्या पाहिजेत. कि तुमच्यामुळे एका शिक्षित व्यक्तीला बंदुक हाती घ्यावी लागली.” असे क्रिकेटपटू गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे म्हटले होते.

त्यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते, “हा माणूस (गौतम गंभीर) मननचा गाव सोडा पण त्याचा जिल्हा सुद्धा नकाशात सापडू शकत नाही. हा म्हणतो की कश्मीरमधील युवकांच्या हाती बंदूकाच्या द्यायला कोण प्रेरीत करत. गंभीर महोदय हे काश्मीर विषयी इतके कमी माहिती आहे जितके मला क्रिकेट विषय आणि मला क्रिकेटविषयी काहीच माहिती नाही.”

ओमर अब्दुलांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना गंभीरने म्हटले आहे. “ओमर अब्दुल्ला तुम्ही नकाशाच्या गप्पा मारू नका. तुम्ही काश्मीरचा नकाशा पाकिस्तानच्या नकाशा सोबत मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. बाहेर येवून सांगा कि तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी किती युवकांना कट्टरवादी गटात समाविष्ट करुण घेण्यासाठी काय केले आहे.”

“माझ्या दोन सहकाऱ्यांची आतंकवाद्यांनी हत्या केली आहे. त्याला अजुन एक आठवडा देखील झाला नाही. 1988 पासुन माझ्या हजारो कार्यकर्त्यांची हत्या आतकंवाद्यांनी केली आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादावर कोणतीही शिकवणीची आवश्यकता नाही.” गंभीरच्या सडेतोड उत्तरानंतर ओमर अब्दुल्लांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“यामध्ये तुम्ही एकटेच नाहीत ओमर अब्दुल्ला, तुमच्यासारखे अनेक राजकारणी स्वत:ला आरसा दाखवणे पसंत करत नाहीत. त्यामुळे माझ्या देशाचे खुप रक्त वाहिले आहे. राष्ट्रवाद आणि बलिदानासाठी वास्तवातील व्यक्तीमत्वाची आवश्यकता असते. तुमच्या सारख्या सोशियल मिडियावर 280 शब्दात तोंड चालवणाऱ्यांची नाही.” असे गंभीरने आणखी एक ट्विट करुन म्हटले आहे.

आज गंभीर आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment