कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातील क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु असे असले तरीही बीसीसीआयसोबत जगातील सर्वच क्रिकेट बोर्ड आता पुन्हा खेळ सुरु करण्याची रणनीती आखण्यास सरुवात करत आहेत.
यादरम्यान माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की, सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वातील बीसीसीआयने (BCCI) या व्हायरसच्या धोक्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर प्रभावित झाला आहे.
गंभीरचा असा विश्वास आहे की, सध्याच्या संकटसमयी बीसीसीआयला नेतृत्वाची भूमिका स्विकारली पाहिजे. “जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, तर माझ्या मनात बीसीसीआयबद्दल आदर आणखी वाढेल,” असेही तो यावेळी म्हणाला.
गंभीरने (Gautam Gambhir) स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम ‘क्रिकेट कनेक्टेड’मध्ये म्हटले की, “बीसीसीआयकडून हे एक सकारात्मक संकेत आहे. कारण मला वाटते की, ते एक मोठं काही तरी करणार आहेत. यामुळे संपूर्ण देशातील वातावरण बदलू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणे महत्त्वाचं आहे. परंतु हे केवळ मालिका जिंकण्याबद्दल नाही. यामुळे भारतात सकारात्मक माहोल बनेल.”
या दौऱ्यात भारतीय संघाला ४ कसोटी सामने खेळायचे आहेत. जर हा दौरा झाला नाही, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरचं नुकसान होईल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-न सांगता संघाबाहेर काढलेला खेळाडू म्हणतो, सचिनबरोबर फलंदाजी करणे म्हणजे…
-जास्तीत जास्त ४ चेंडू, त्यापेक्षा जास्त स्मिथ माझ्यापुढे टिकणं कठीण
-भारतीय क्रिकेटपटूंनी स्लेजिंग केलेल्या ५ घटना, ज्याची आजही होते चर्चा