वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो आपल्या शानदार फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सोमवारी (20 नोव्हेंबर) लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 अंतर्गत रांचीमध्ये झालेल्या सामन्यात गेल पुन्हा एकदा त्याच्या जुन्या रंगात दिसला.
गुजरात जायंट्सकडून सलामी करताना त्याने मणिपाल टायगर्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ख्रिस गेल (Chris Gayle) याने 24 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारला आणि 158 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 38 धावा केल्या. यावेळी त्याने एका हाताने षटकार मारून सामन्याची मैफिल लुटली.
सहाव्या षटकात हे दृश्य दिसले. कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) याने फ्री हिट टाकल्यावर आधीच तयार असलेल्या गेलने शानदार पुल शॉट मारला आणि एका हाताने डीपच्या दिशेने षटकार मारला. हे दृश्य पाहून स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. याआधी गेलने नो बॉलवर चौकार मारला होता. एकूणच त्याची खेळी उत्कृष्ट होती.
मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मणिपाल टायगर्सने हा सामना 10 धावांनी जिंकला. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल त्याच्या षटकारांसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या गगनचुंबी षटकारांनी प्रेक्षकांच्या मनात रोमांच भरले. आता पुन्हा एकदा त्याने हा नजारा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Gayle, you freak! Smashes a one-handed six to announce his arrival in #LegendsLeagueCricket
.
.#LegendsOnFanCode @llct20 @giants_gujarat @henrygayle pic.twitter.com/awUnuUn3Il— FanCode (@FanCode) November 20, 2023
निवृत्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, असे गेलने जूनमध्ये सांगितले होते. मी अजूनही क्रिकेट खेळतोय. लोकांना अजूनही मला खेळताना बघायचे आहे. मी खेळण्यासाठी पुरेसा फिट आहे. मात्र, गेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून बराच काळ लोटला आहे. 44 वर्षीय गेलने नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा टी20 सामना खेळला होता. तेव्हापासून तो लिजेंड्स लीगसारख्या स्पर्धांमध्ये दिसतो.(Gayle Jalwa in Legends League Marra hits one-handed six watch video)
म्हत्वाच्या बातम्या
वर्ल्डकपनंतर वॉर्नरने जिंकले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मोठ्या मनाने माफी मागत म्हणाला…
‘संजू सॅमसनने निवृत्ती घ्यावी’, टीम इंडियातून वगळण्यात आल्याने सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप